आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरात चकमक; चार जवान शहीद; चार दहशतवाद्यांचाही खात्मा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू- जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात हलमतपोरा चकमकीत भारतीय लष्कराचे २ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांतील २ असे ४ जवान शहीद झाले. २ पोलिस जखमी आहेत. दरम्यान, या चकमकीत ४ दहशतवादीही मारले गेले आहेत. उशीरापर्यंत ही चकमक सुरू हाेती. 


गस्तीवरील लष्करी जवान व जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष कारवाई पथकावर अतिरेक्यांनी गोळीबार केल्यानंतर चकमक झडली. लष्कराचे पॅरा कमांडोही या कारवाईत सहभागी आहेत. या भागात ७ अतिरेकी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा पथकाने या भागात शोधमोहीम सुरू केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नियंत्रणरेषा ओलांडून ओलांडून दहशतवाद्यांचा एक गट सुमारे ८ किमी आत शिरला होता. या दरम्यान सुरक्षा दलांना याची माहिती मिळाली. सुरक्षा दलांनी नाकाबंदी केली तेव्हा दहशतवादी एका मशिदीत लपून बसले होते.या मोहिमेत ४ दहशतवादी ठार झाले, तर तिघे लपून बसले आहेत. 


कुठे झाले एन्काऊंटर.. 
हे एन्काउंटर कुपवाडाच्या हलमतपोरा परिसरात झाले. आर्मीचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी लष्कर आणि एसओजीच्या जॉइंट पार्टीचे सर्च ऑपरेशन सुरू होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी अचानक फायरिंग सुरू केले. त्यात एक पोलिस कर्मचारी घायळ झाला. जावीद अहमद असे त्याचे नाव आहे. या ऑपरेशनमध्ये लष्कराच्या पॅरा कमांडोची मदतही घेतली जात आहे. मारले गेलेले चारही दहशतवादी विदेशी असल्याचे सांगितले जात आहे. तीन दहशतवाद्यांचे मृतदेह मंगळवारी मिळाले. तर बुधवारी एकाचा मृतदेह मिळाला. 


30 तासांपासून एन्काऊंटर सुरू 
- हलमतपोरा परिसरात मंगळवारपासून म्हणजे सुमारे 30 तासांपासून हे एन्काऊंटर सुरू आहे. येथे 6 ते 7 दहशतवादी लपलेले असल्याचे सांगितले जात आहे. शहीद पोलिस कर्मचाऱ्यांची नावे दीपक पंडित आणि मोहम्मद युसूफ आहे.