आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • सावधान! ही आहे 20 वर्षांची लुटेरी दुल्हन, 3 वर्षांत 3 लग्नांतून तिने कमावले 10 लाख रुपये 20 Year Old Robber Bride

ही आहे 20 वर्षांची लुटेरी दुल्हन, 3 वर्षांत 3 लग्नांतून तिने कमावले 10 लाख रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर - 15 एप्रिल रोजी सासरहून पळून गेलेल्या लुटेरी दुल्हनला पोलिसांनी गुरुवारी डुंगरपूरहून अटक केली. कोर्टाच्या आदेशावरून तिची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांच्या मते, बनावट लग्न करून पैसे लुबाडणारी नववधू कर्नाटकची नेत्रावती हिने एका वर्षभरात दुसरे आणि 3 वर्षांत 3 बनावट लग्न केले. यामाध्यमातून तिने 10 लाख रुपये कमावल्याचे समोर आले आहे. चौकशीत ती म्हणाली, कर्नाटकातील तिच्या गावात बहुतांश घरांमध्ये तरुणींचे असेच लग्न होते. पैशांच्या लोभापायी ती नवरा बदलत होती. तिला तिची आईच या धंद्यात घेऊन आली.

 

पैशांच्या लोभापायी ती नवरा बदलत होती

- लुटेरी दुल्हन नेत्रावती ही नुकतीच अशोक जैनसोबत लग्न करून काही काळ त्याच्यासोबत राहिली, मग 15 एप्रिल रोजी पळून थेट कर्नाटकातील आपल्या गावी गेली.
- दुसऱ्यांदा दलालाशी संपर्क करून डुंगरपूरच्या भरत जैनशी 9 मे रोजी 4.50 लाख रुपये घेऊन लग्न केले. तेथून पळून जाऊन आणखी कुणाशी तरी लग्नाच्या बेतात होती, परंतु त्यापूर्वीच पोलिसांनी तिला अटक केली.

 

आईच्या सांगण्यावरून बनली लुटेरी दुल्हन, 17 वर्षे वयात केले पहिले लग्न, 3 वर्षांत 3
- पोलिस म्हणाले, तिची आई कौशल्याच तिला असे करायला भाग पाडत होती. नेत्रावती 17 वर्षांची होती तेव्हा घरच्यांनी नातेवाइकांच्या ओळखीने समाजातच लग्न लावले होते.
- वर्षभर सासरी राहिल्यावर तिचा घटस्फोट झाला. मग आईच्या सांगण्यावरून दलालांशी संपर्क केला आणि अशोक जैनशी लग्न केले.
- येथे तिला 5 लाख रुपये मिळाले. 15 एप्रिल रोजी येथून पळून गेल्यानंतर कर्नाटकात गेली आणि पैसे घरी आणून दिले. डूंगरपूरमध्येही 4.50 लाख रुपये घेऊन तिने लग्न थाटले.

 

असे होते प्रकरण
डुंगरपूरच्या गोल मार्केटमधील रहिवासी अनिल जैन यांनी 15 एप्रिल रोजी रिपोर्ट दाखल केली होती. सूत्रांनुसार, अनिल यांचा लहान भाऊ अशोक कुमार जैन याचे लग्न गतवर्षी 17 जुलै रोजी बेळगाव (कर्नाटक)ची रहिवासी मैत्रावतीशी झाले होते. मैत्रावती मात्र दोन महिने सासरी राहिल्यावर फरार झाली.  

बातम्या आणखी आहेत...