आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Love Marriage: 65 वर्षांची परदेशी नवरी, 28 वर्षांचा देशी नवरदेव, अशी आहे प्रेम कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅथल - अमेरिकेत राहणारी 65 वर्षीय महिला आपल्या प्रियकराची भेट घेण्यासाठी तब्बल 14000 किमींचा प्रवास करून हरियाणात पोहोचली. तिने याच गावातील एका 28 वर्षीय तरुणासोबत विवाह केला आहे. या दोघांची पहिली भेट फेसबूकवरून झाली. त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग आणि प्रेम फुलले. देश आणि वयाच्या सर्व सीमा ओलांडणाऱ्या या कपलने 21 जून रोजी भारतीय परमपरेनुसार विवाह केला आहे.


मजूर आहे नवरदेव...
- कॅथल जिल्ह्यातील सैर गावात राहणारा प्रविण एक मजूर आहे. तर 65 वर्षीय कॅरन लिलियम अमेरिकेची नागरिक आहे. 
- 2017 मध्ये फेसबूकवर दोघांचे बोलणे झाले. यानंतर दोघांमध्ये फेसबूक चॅट आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून रोज संवाद सुरू झाला. 8 महिन्यांच्या मैत्री आणि प्रेमानंतर या दोघांनी 21 जून रोजी शिख रुढीनुसार विवाह केला. 
- प्रविणने सांगितल्याप्रमाणे, 21 जून रोजी कॅरनचे वाढदिवस होता. त्यामुळे, दोघांनी याच दिवशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. प्रविणने M.A. केले आहे. परंतु, नोकरी मिळाली नसल्याने तो सध्या मजुरी करतो. त्याचे आई-वडील सुद्धा मजूर आहेत. 
- त्यानेच सांगितले, की जेव्हा कॅरनने विवाहासाठी भारतात येण्याचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा, तिला रिसीव्ह करण्यासाठी एअरपोर्टवर जाण्याइतके पैसे सुद्धा त्याच्याकडे नव्हते. यानंतर कॅरनने बस प्रवास करून विमानतळ ते गावात येण्याचा निर्णय घेतला. कॅरनला त्याने आपल्या गरीबीविषयी यापूर्वीच सांगितले होते. 
- फेसबूकवर बोलतानाच कॅरनने सुद्धा प्रविणला आपल्याविषयी पूर्ण माहिती दिली. एका कार अपघातात पतीचा मृत्यू झाला. ती आयुष्यभर कधीच आई होऊ शकली नाही. त्यामुळे, अमेरिकेत ती एकटीच राहत होती. आपल्या शेवटच्या क्षणांमध्ये सोबत कुणी राहावे अशी तिची इच्छा होती. त्यानंतरच कॅरन आणि प्रविणने लग्नाचा निर्णय घेतला. 

 

पुढे, वाचा अशाच आणखी काही Love Stories...

 

बातम्या आणखी आहेत...