आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11000 व्होल्ट करंटमुळे होरपळून 3 ठार, घरमालक म्हणाला होता - सेटिंग आहे वीज बंद करतो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना - रविवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास लुधियानाच्या टिब्बा रोड सुभाष नगरमध्ये घरकाम करणाऱ्या तीन मजुरांचा करंटमुळे होरपळून मृत्यू झाला. या घटनेचे गांभीर्य यावरूनच लक्षात येते की, घटनेनंतर सर्व मजूर जेथे होते त्या त्या ठिकाणीच चिटकून गेले. आरोपी घरमालकाला अटक करण्यात आली आहे.

 

पीडितांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, आरोपींचे समर्थक मृतांची किंमत ठरवून प्रकरण मिटवण्यासाठी दबाव आणत आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना एसीपींच्या कार्यालयात बोलावले होते. त्याठिकाणी प्रत्येक मजुराच्या मृत्यू प्रकरणी दीड लाखांची नुकसान भरपाई देऊ केली, नंतर ते रेटही वाढवत राहिले. 

 

प्रत्यक्षदर्शीने सांगितली घटनेबाबत.. 
एक मिस्त्रीचा तारेला स्पर्श झाला, त्याचा हात दुसऱ्याला तर पाय तिसऱ्याला चिटकला 
अपघातात बचावलेला चौथा मजूर सुरजितने सांगितले की, जेव्हा आम्ही चौघांनी समोर हाय टेन्शन तारा पाहिल्या तेव्हा कामाला नकार दिला होता. पण घरमालक म्हणाला, या 1100 व्होल्टच्या तारा आहेत. करंट लागणार नाही. मी ऐकलो नाही तेव्हा, त्याने दोन वीज काम करणाऱ्यांना बोलावले. ते सरकारी कर्मचारी असल्याचे सांगितले.

 

त्याने वीज सप्लाय बंद करून तारेभोवती प्लास्टीक पाईप टाकले. पण आम्ही तरीही कामाला तयार नव्हतो. त्यावर तो म्हणाला सप्लाय बंद केला आहे. पण पाईप टाकल्यानंतर सप्लाय सुरू केला होता. मिस्त्रीने पुन्हा नकार दिला. त्यावर मालकाने आम्हाला कामाचे 20 हजार रुपये द्यायला नकार दिला. नंतर अनेक प्रकारचे आमीष दाखवून काम सुरू केले. सतरंजन प्लास्टर करत होता. मी त्याला सिमेंटचा मसाला दिला. त्याचदरम्यान त्याची मान हायटेन्शन तारांना लागली. करंट लागताच त्याचा पाय राकेशला तर हात मुकेशला लागला. त्यानंतर एक जोरदार स्फोट झाला. त्यामुळे  राकेश बाजुला पडला आणि तो गजांमध्ये अडकला. तर मुकेश दूर पडला. त्याचे हात घराच्या जाळीत अडकले.

 

स्फोट होताच शरीराचे अक्षरशः चिथडे उडाले व रक्त वाहू लागले. स्फोट झाल्यानंतर त्या तिघांनी पेट घेतला होता. मी घाबरून खाली पळालो आणि ओरडून सहकाऱ्यांना बोलावले. सर्वांनी वाळू टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत तिघांचा मृत्यू झाला होता. तिघेही जागेवरच चिटकले होते. पोलिसांनी घरमालक राजूच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...