आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मोठी बातमी: भारताच्या 4 दिव्यांग जलतरणपटूंनी इंग्लिश खाडी पार करून केला रेकॉर्ड 4 Para Swimmer Creates Record By Crossing English Channel In Just 12 Hours.

भारताच्या 4 दिव्यांग जलतरणपटूंनी इंग्लिश खाडी पार करून केला रेकॉर्ड, असा होता संघर्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

-टाटा ट्रस्टने या इव्हेंटचा 60 टक्के खर्च उचलला.

- चारही जलतरणपटूंनी समुद्रात एकूण 36 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला.

 

भोपाळ/जयपूर/मुंबई - भारताच्या 4 दिव्यांग जलतरणपटूंच्या रिले टीमने 36 किलोमीटर लांब इंग्लिश खाडी 12 तास 26 मिनिटांत पार करण्याचा रेकॉर्ड बनवला. इंग्लिश खाडी पार करणारी ही पहिली आशियायी टीम आहे. जलतरणपटूंनी दैनिक भास्करसोबत या विक्रमाचा अनुभव शेअर केला. यातून त्यांचा संघर्षाचा अद्वितीय प्रवास समोर आला.
कुणापुढे पैशांची अडचण आली, तर त्याने वडिलांची एफडी मोडली, मित्रांकडून उधार घेतले. काहींना टोमणे सहन करावे लागले, तर तलावात पोहून अथंग समुद्राशी टक्कर घेण्याचे धाडस अंगी बाणवले. या टीममध्ये मध्यप्रदेशचे सत्येंद्र सिंह लोहिया, राजस्थानचे जगदीशचंद्र तैली, महाराष्ट्राचे चेतन राऊत आणि बंगालचे रिमो शहा सामील होते.

 

चेतनकडे लंडनपर्यंत जाण्याचेही नव्हते पैसे: 
अमरावतीचा रहिवासी चेतन राऊत (24) उजव्या पायाने 50% पर्यंत दिव्यांग आहेत. चेतन म्हणाला, "वडील शाळेमध्ये शिपाई होते. जलतरणासाठी त्यांनी मला पुण्याला पाठवले. दोन वर्षांपूर्वी अपघातात त्यांचे निधन झाले. यानंतर इंग्लिश खाडी पार करण्यासाठी लंडनला जाण्याचेही पैसे नव्हते. पैशांची व्यवस्था करण्यासाठी मी वडिलांची एफडी मोडली. मित्र आणि नातेवाइकांकडून उधार घेतले. टीमच्या इतर साथीदारांनीही क्राउड फंडिंग आणि इतर माध्यमांतून पैसे जमवले. तरीही पैसे जमत नव्हते. टाटा ट्रस्टने या इव्हेंटचा 60 टक्के खर्च उचलला. आज मला आनंद आहे की, मी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले."

 

सत्येंद्रला लहानपणापासून प्रत्येक जण मारत होता टोमणे: 
ग्वाल्हेरचे रहिवासी सत्येंद्र (31) म्हणाले, "दिव्यांग असल्याने लहानपणापासून टोमणे मारले जायचे. परंतु यातूनच मला ताकद मिळाली. गावातील बैसली नदीमध्ये पोहणे सुरू केले. एप्रिल 2017 मध्ये भोपालमध्ये मध्यप्रदेशच्या क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना मी इंग्लिश खाडी पार करण्याची इच्छा जाहीर केली तेव्हा त्यांनी खिल्ली उडवत भोपाळचा मोठा तलाव पोहून पार करण्याचे चॅलेंज दिले होते." सत्येंद्र दोन्ही पायांनी 65% पर्यंत दिव्यांग आहे.

 

तलावात पोहून जगदीश शिकला पोहणे: 
जगदीशचंद्र तैली (34) म्हणाले, ''मी स्विमिंगची सुरुवात राजसमंद तलावातून केली होती. वडील शेतकरी आहेत. मुंबईत खर्च भागवण्यासाठी वेगवेगळ्या जागी जाऊन स्विमिंगही शिकवली. इंग्लिश खाडी पार करताना 60 टक्के प्रवास सहन पार केला होता, परंतु मग समुद्रात उंच लाटा उसळल्याने 1 तासांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी 3 तास लागले. लाटांनी रस्ता भटकवण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही थांबलो नाही. एका ठिकाणी जेली फिशने दंश केला. तरीही टीमचा धीर खचला नाही.'' जगदीश डाव्या पायाने 55% दिव्यांग आहेत.

 

रिमोने एक वेळ जेवण करून काढले दिवस: 
पश्चिम बंगालच्या हावड़ाचे रहिवासी रिमो शाह (27) डाव्या पायाने 55% दिव्यांग आहेत. ते म्हणाले, "येथपर्यंत पोहोचण्यासाठी मला मोठा संघर्ष करावा लागला. वडिलांचा बिझनेस तोट्यात गेला आणि पैसे संपले. एक वेळ अशीही आली जेव्हा आम्हाला दिवसातून केवळ एक वेळ जेवण मिळू लागले. परंतु आईवडिलांनी हिम्मत सोडली नाही आणि नेहमी मला पुढे जाण्यासाठी प्रेरित केले."

 

जलतरणपटूंसाठी एव्हरेस्टसारखी आहे इंग्लिश खाडी: 
रिमो म्हणाला, "इंग्लिश खाडी पार करणे प्रत्येक जलतरणपटूचे स्वप्न असते. त्यांच्यासाठी हे एव्हरेस्टवर विजय मिळवण्यापेक्षा कमी नसते. 10 ते 12 डिग्री सेल्सियस तापमानात समुद्राच्या लाटांना चिरत पुढे जाणे, त्याचप्रमाणे असते ज्याप्रमाणे एक गिर्यारोहक बर्फाळ डोंगरावर चढत असतो. हे यश आम्हाला युद्ध जिंकून आल्यासारखा अनुभव देते."

 

अशी पार केली इंग्लिश खाडी: 
या रिले स्विमिंगमध्ये चारही जलतरणपटूंनी मिळून एकूण 36 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. नियमानुसार प्रत्येक जलतरणपटूला 1 तास पोहायचे होते. त्यानंतर 3 इतर जलतरपटू क्रमाने एक-एक तास पोहून पुढे गेले. या अभियानाची सुरुवात राजस्थानच्या जगदीशचंद्र तैलीने केली. त्यानंतर दुसरा नंबर महाराष्ट्राच्या चेतन राऊत, तिसरा नंबर बंगालच्या रिमो शहा आणि मग चौथा नंबर मध्यप्रदेशच्या सत्येंद्रचा होता.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...   

 

बातम्या आणखी आहेत...