आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खतरनाक बायको: बंदुकीच्या धाकावर कापले पतीचे दोन्ही कान, रक्तबंबाळ अवस्थेत मृत समजून झाली फरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - पश्चिम बंगालच्या कोलकातामधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका महिलेने आपल्यापेक्षा वयाने 20 वर्षे लहान पतीचे दोन्ही कान कापून वेगळे केले. एवढेच नाही, तिने कापलेल्या कानांचे अक्षरश: तुकडेही केले. या कामात आरोपी विवाहितेला तिच्या बहिणीने साथ दिली. यानंतर नवऱ्याला मृत समजून ती पळून गेली. ही घटना सेंट्रल कोलकाताच्या नारकेलडांगा परिसरातील आहे. सूत्रांनुसार, दोघांनी दोनच वर्षांपूर्वी लग्न केले होते.

 

बंदुकीच्या धाकावर शरीरापासून वेगळे केले कान
पोलिसांनी सांगितले की, 40 वर्षीय आरोपी महिला मुमताज बीबी आणि तिचा पती तनवीर नारकेलडांगा नॉर्थ रोड परिसरात दोन वर्षांपासून राहत होते. येथेच मुमताजने तनवीरवर हल्ला केला. प्रत्यक्षदर्शी म्हणाले, हल्ल्यानंतर तन्वीरचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊ लागला होता. यामुळे कुटुंबीयांनी त्याला त्वरित रुग्णालयात हलवले. दुसरीकडे, आरोपी पत्नी त्याला मृत समजून तेथून पळून गेली. मेडिकल रिपोर्टमध्ये समोर आले आहे की, त्याचे दोन्ही कान शरीरापासून वेगळे झाले आहेत. कुटुंबीयांनी मुमताजविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

 

बहिणीसोबत मिळून बायको करायची मारहाण
पीडित पती तनवीरने मीडियाशी बोलताना सांगितले की, मुमताजने बंदुकीच्या धाकावर माझे कान कापले. नुकताच तो मुमताजच्या जाचामुळे पळून गेला होता, परंतु मुमताज आणि तिच्या साथीदारांनी त्याला पुन्हा पकडून येथे आणले. तो म्हणाला की, मुमताज आणि तिची बहीण त्याला नेहमी मारझोड करायची.

 

मुलाकडून पैसे वसूल करायची सून
तनवीरच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, लग्नानंतरच मुमताजने नवऱ्याचा छळ करायला सुरुवात केली होती. ती त्याला त्याच्या घरच्यांनाही भेटू देत नव्हती. यामुळे अनेकदा तनवीरने घरातून पळून जाण्याचाही प्रयत्न केला, परंतु ती नेहमी त्याला पकडून आणायची. कुटुंबीयांचा आरोप आहे की, मुमताज त्याच्याकडून पैसेही वसूल करायची. यामुळे तनवीरच्या आईने आपली संपत्ती विकली आणि मुमताजला पैसे देऊन मुलाची सुटका करण्याची विनवणी केली. यावर मुमताजने पैसे तर घेतले, परंतु तनवीरला सोडले नाही. पोलिस आरोपी पत्नीचा शोध घेत आहेत.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...   

 

 

बातम्या आणखी आहेत...