आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • High Profile मर्डर केसचा पोलिसांनी असा सोडवला गुंता; मित्राच्या पत्नीशी करायचे होते लग्न 5 Clues How Police Solved Murder Mystery Of Shailja Dwivedi

High Profile मर्डर केसचा असा केला पोलिसांनी खुलासा; मित्राच्या पत्नीशी करायचे होते लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मेजरची पत्नी शैलजा द्विवेदी हायप्रोफाइल मर्डर केस उलगडल्याचा पोलिसांनी दावा केला आहे. दिल्लीतील डीसीपी विजय कुमार यांनी संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली आहे. यामध्ये 3 वर्षांच्या अवैध नाते संबंध समोर आले आहेत. शैलजा आणि आरोपी मेजर निखिल यांच्यात तासंतास फोन संभाषणांचा देखील पोलिसांनी उल्लेख केला. काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतरच आरोपी मेजर निखिलने शैलजाचा 23 जून रोजी खून केला. मेजर अमित द्विवेदीची पत्नी शैलजा हिचा मृतदेह दिल्ली मेट्रो स्टेशनजवळ सापडला. 

पोलिसांच्या मते, मेजर निखिलने गुन्हा कबूल केला आहे की, शैलजा त्याची झाली नाही म्हणून खून केला. पोलिसांच्या रडारवर मेजर निखिल हांडा कसा आला यामागची कहाणीही खूप रंजक आहे. 

 

असा जोडला धाग्याला धागा
वास्तविक, पोलिसांनी शैलजाच्या मोबाइलची सीडीआर काढली. यावरून स्पष्ट झाले की, शनिवारी 10 ते 1 वाजेदरम्यान शैलजाने मेजर हांडाशी बोलणे केले होते. यांनतर पोलिसांनी सर्व धागे आपसात जुळवले.

 

पहिला सुगावा
सर्वात पहिला सुगावा हॉस्पिटलच्या सीसीटीव्हीतून मिळाला. येथे शैलजाला भेटायला मेजर निखिल आला होता. निखिलसोबत शैलजा हॉस्पिटलच्या बाहेर जाताना दिसली. ज्या गाडीत शैलजा होती, ती एक प्रायव्हेट पांढऱ्या रंगाची कार होती. पोलिसांच्या मते, ही हत्या एकानेच केली असली तरी आणखी दोन जणांवर संशय आहे.

 

दुसरा सुगावा
निखिल हॉस्पिटलमध्ये दिसला, परंतु हत्येनंतर तो फरार होता. त्याचा फोनही स्विच ऑफ होता. चौकशीत कळले की, शैलजासोबत हॉस्पिटलमध्ये दिसलेली व्यक्ती निखिल हांडाच आहे, तो दीमापूरमध्ये तैनात होता, परंतु अचानक शैलजाला भेटायला दिल्लीला आला होता.


तिसरा सुगावा
पोलिसांनी सांगितले की, मृत शैलजाची मोबाइल डिटेल्स तपासली तेव्हा निखिलने शैलजाला वर्षभरात तब्बल 3000 कॉल केल्याचे समोर आले. एवढे कॉल केल्यामुळे पोलिसांना निखिलवर संशय आला. पोलिसांनी जेव्हा मेजर निखिलला काँटॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो पळून जात असल्याचे लक्षात आले. यामुळे पोलिसांचा निखिलवरील संशय आणखी बळावला.

 

चौथ सुगावा
निखिलने चौकशीत कबूल केले की, तो 2 जून रोजी दीमापूरहून सुटी घेऊन शैलजासाठी दिल्लीला आला होता. आरोपीने ठरवले होते की, शैलजा त्याची झाली नाही, तर हत्या करायची. त्याला शैलजाशी लग्न करायचे होते.


पाचवा सुगावा
मेजर निखिलने आपला मोबाइल स्विच ऑफ केला होता, यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. मेजर निखिलने आपल्या कुटुंबाशीही संपर्क तोडला होता, यामुळे त्याच्यावर संशय आणखीनच बळावला. तथापि, यादरम्यान त्याने व्हॉट्सअॅप कॉलिंगच्या माध्यमातून काही जणांना संपर्क केला, यावरून पोलिसांनी त्याला ट्रॅक केले. पोलिसांनी सांगितले की, एका टोल नाक्यावर निखिलची कार ट्रेस झाली आणि मग मेरठमध्ये त्याला जेरबंद करण्यात आले.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या प्रकरणाचे आणखी Photos...   

बातम्या आणखी आहेत...