आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ONGC च्या 46 वर्षे जुन्या जहाजावर स्फोटामुळे 5 जणांचा मृत्यू, 10 हून अधिक जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे जहाज शिपयार्डमध्ये दुरुस्तीसाठी आणण्यात आले होते. - Divya Marathi
हे जहाज शिपयार्डमध्ये दुरुस्तीसाठी आणण्यात आले होते.

कोच्ची - ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) च्या कोचीनमध्ये एका जहाजावर मंगळवारी स्फोट झाला. त्यानंतर त्याला आग लागली. अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 हून अधिक जखमी झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. सागर भूषण नावाचे हे जहाज 46 वर्षे जुने असल्याचे सांगितले जात आहे. सुमारे एका महिन्यापूर्वी शिपयार्डमध्ये दुरुस्तीसाठी ते सुमारे आणण्यात आले होते. 


शिपमध्ये होते 20 वर्कर 
- कोच्चीचे पोलिस कमिश्नर एमपी दिनेश यांनी न्यूज एजन्सीशी बोलताना सांगितले की, ब्लास्ट सकाळी 11 च्या सुमारास झाला. अपघाताच्या वेळी जहाजामध्ये सुमारे 20 जण होते. मृत आणि जखमींमध्ये बहुतांश डेली लेबर आणि वर्कर होते. 
- ते म्हणाले की, आगीमुळे संपूर्ण जाहाजावर धूर पसरला होता. काही लोकांचा मृत्यू त्यात श्वास गुदमरल्यामुळेही झाला. पोलिस आयुक्तांनी सांगितले की, घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 


वॉटर टँकमध्ये ब्लास्ट 
प्राथमिक माहितीनुसार या जहाजाच्या वॉटर टँकमध्ये ब्लास्ट झाला होता. मारल्या गेलेल्या लोकांमध्ये 2 केरळचे असल्याचे सांगितले जात आहे. 


शिपमध्ये अडकलेल्या दोघांना वाचवले 
कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या प्रवक्त्यांवी न्यूज एजन्सीशी बोलताना सांगितले की, आग लागल्यानंतर दोन जण जहाजात अडकले होते. त्यांना बचावकार्यादरम्यान त्यांना बाहेर काढण्यात आले. जखमी झालेल्या सर्वांना स्थानिक हॉस्पीटलमध्ये दाखल असलेल्या सर्वांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


गडकरींनी व्यक्त केले दुःख 
- केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी या अपघातात मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबाप्रती दुःख व्यक्त केले आहे. 
- कोचीन शिपयार्डच्या व्यवस्थापकीय संचालकांशी बोलून सर्व जखमींना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत, असे ते म्हणाले. 
- गडकरींनी या अपघाताशी संबंधित एजन्सीला चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...