आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • दीड वर्षाच्या बाळाला 5 भटक्या कुत्र्यांनी घेतले 93 चावे, लोक येईपर्यंत शरीराचे तोडले लचके 5 Dogs Killed One And Half Year Old Boy

दीड वर्षाच्या बाळाला 5 भटक्या कुत्र्यांनी घेतले 93 चावे, लोक येईपर्यंत शरीराचे तोडले लचके

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - सेक्टर-18 सीके पार्कमध्ये ओपन जिमजवळ खेळत असलेल्या 4 भावाबहिणींवर 5 भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला. पैकी 3 मुले मोठी असल्याने पळून जाण्यात यशस्वी ठरली, परंतु दीड वर्षाचा आयुष मात्र पळू शकला नाही, भटक्या कुत्र्यांच्या तावडीत तो सापडला. तो जमिनीवर पडला तेव्हा पाचही कुत्रे त्याच्यावर तुटून पडले. बालकाच्या शरीरावर 93 जागी कुत्र्यांनी चावे घेतले. बाळाचे नाजूक शरीराचे या हिंस्त्र कुत्र्यांनी लचके तोडले. जवळपास 1 ते 2 मिनिटांपर्यंत ते मांसाचे लचके तोडून खात राहिले. डोक्याचे केसही उपटले. तडफडणाऱ्या चिमुकल्याला जेव्हा आसपासच्या लोकांनी पाहिले तेव्हा दगडांचा मारा करून त्यांनी कुत्र्यांना पिटाळून लावले. बाळ बेशुद्ध झाले होते. पोलिसांच्या मदतीने त्याला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले, जेथे त्याचा मृत्यू झाला. 

 

आरडाओरड ऐकून लोक आले, मारले दगड
- रविवारी ममता ही महिला बंगल्यांमध्ये कामासाठी गेली होती. मुले अंजली (6), आनंद (साडे 4), अर्पित (3) आणि आयुष (दीड वर्ष) हेही सोबत होते. पार्कच्या जवळच एका चहा विक्रेती बसते, ती ममताची नातेवाईक आहे. ममताने चारही मुलांना दुकानावर सोडले आणि काम करण्यासाठी निघून गेली. चारही भावंडे पार्कमध्ये खेळू लागली.
- यादरम्यान 5 कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. तीन भाऊ-बहीण पळून जाण्यात यशस्वी ठरले, परंतु दीड वर्षाचा आयुष तेथेच अडकला. कुत्र्यांनी त्याला खाली पाडले आणि लचके तोडायला सुरुवात केली.
- आयुषचे दोन भाऊ पळत चहाच्या दुकानावर गेले, तर मोठी बहीण अंजली आईला बोलवण्यासाठी धावली. आरडाओरड ऐकून लोक दगड घेऊन बालकाला वाचवण्यासाठी आले तेव्हा कुत्रे पळून गेले. काही जण पार्कजवळ उभ्या पीसीआरकडे गेले. पीसीआरच्या जिप्सीमधूनच आयुषला जीएमएसएच-16 ला नेण्यात आले. येथे त्याचा मृत्यू झाला.

 

बोर्ड आणि मनपावर गुन्हा दाखल व्हावा: बिट्टू

- फॉसवॅक प्रेसिडेंट, बलजिंदर बिट्टू म्हणाले की, वेल्फेअर बोर्ड आणि स्ट्रीट डॉग स्टरलाइजेशन करणाऱ्या मनपाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा. देशात स्ट्रीट डॉगच्या सुरक्षेसाठी तर कायदा आहे, परंतु माणसासाठी कोणतीही सिक्युरिटी नाही. मनपाने बालकाच्या कुटुंबाला भरपाई दिली पाहिजे.
- 2015 मध्ये मनीमाजरामध्ये स्ट्रीट डॉगच्या चाव्यामुळे रेबीज होऊन सादियाचा मृत्यू झाल्यावर 3 लाखांची भरपाई देण्यात आली होती.

बालकाची आई ममता म्हणाली की, 'माझी मुलगी माझ्याकडे धावत आली. मी जेव्हा पार्कमध्ये पोहोचले तेव्हा आयुष जखमी अवस्थेत होता. मग पोलिसांसोबतच हॉस्पिटलमध्ये गेले. येथे काही वेळानंतर डॉक्टर म्हणाले की, मुलगा आता हे जग सोडून गेला आहे.' एवढे बोलून ती ओक्साबोक्शी रडू लागली. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित काही Photos... 

बातम्या आणखी आहेत...