आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • चर्चमध्ये Sex Scandle: महिलेला ब्लॅकमेल करून लैंगिक शोषण करत होते 5 फादर 5 Priests Suspended From Church For Abuse And Blackmail Woman In Kerala

चर्चमध्ये सेक्स स्कँडल: महिलेला Blackmail करून लैंगिक शोषण करायचे 5 फादर, चर्चने केली कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क- केरळच्या एका चर्चमध्ये 5 धर्मगुरूंनी एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर चर्चने या पादरींना त्यांच्या पदावरून हटवले आहे. 

 

असे आहे प्रकरण

केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील थिरुवल्लामधील रहिवासी महिलेच्या पतीने एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये पीडिताच्या पतीने सांगितले की, त्याच्या पत्नीवर एका पादरीने लग्नाच्या आधी बलात्कार केला होता. पीडितेचा पती म्हणाला, त्या पादरीने पत्नीचे लग्नानंतरही शोषण केले. मुलीच्या बाप्तिस्मा कार्यक्रमादरम्यान पीडितेने चर्चच्या आणखी एका पादरीसमोर लैंगिक शोषण झाल्याचे कन्फेस केले. मग या पादरीनेही महिलेला ब्लॅकमेल करणे सुरू केले आणि बळजबरी तिच्यासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केले.

 

एकूण 5 पादरींनी ब्लॅकमेल करून केला बलात्कार

महिलेच्या पतीने ऑडिओ क्लिपमध्ये सांगितले की, दुसऱ्या पादरीने ही बाब इतर पादरींनाही सांगितली. एकूण 5 पादरींनी मग महिलेला ब्लॅकमेल करून तिचे लैंगिक शोषण सुरू केले. महिलेच्या पतीने सध्या या प्रकरणाची माहिती मलानकारा ऑर्थोडॉक्स चर्चला सांगितली आहे. यानंतर आरोपी पादरींना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे, तथापि अद्याप आरोपी पादरींची नावे जाहीर झालेली नाहीत.

 

काय म्हणतात पोलिस?

पीडितेच्या पतीने या ऑडिओ क्लिपमध्ये स्वत:ची व पत्नीची ओळख सार्वजनिक केलेली नाही. हे प्रकरण अद्याप पोलिसांत गेलेले नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत त्यांना अशी कोणतीही तक्रार मिळालेली नाही, तक्रार मिळाल्यानंतर उचित कारवाई केली जाईल.

 

काय म्हणते चर्च..
या पूर्ण प्रकरणावर चर्चचे प्रवक्ते म्हणाले की, पादरींवर लागलेले आरोप खूप जुने आहेत आणि त्यामागचे तथ्य तपासण्यासाठी चौकशी सुरू आहे. चर्चचे प्रवक्ते असेही म्हणाले की, जर आरोपी पादरींविरुद्ध सबळ पुरावे आढळले, तर हे प्रकरण पोलिसांकडे सोपवले जाईल.   

 

बातम्या आणखी आहेत...