आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर काश्मीरमध्ये हिमस्खलन: 5 जवान बेपत्ता, रेस्क्यू ऑपरेशन सुरू; एकाचा डोंगरावरून पडून मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - उत्तर काश्मिरात सोमवारी दोन हिमस्खलन झाले. यानंतर फॉरवर्ड पोस्टवर तैनात लष्कराचे 5 जवान बेपत्ता झाले. गुरेज सेक्टरमध्ये आर्मीतील ओझे वाहणाऱ्या एका व्यक्तीचा डोंगरकड्यावरून पडून मृत्यू झाला. बेपत्ता सैनिकांच्या शोधासाठी मोहीम सुरू आहे.

 

सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन चालवण्यात आले
- ऑफिशियल सोर्सेसने वृत्तसंस्थेला सांगितले की, सोमवारी हिमवर्षावामुळे हिमस्खलनाची घटना घडली.
- बांदीपोरा जिल्ह्यात गुरेजजवळील मणिपोस्टवर हिमस्खलन झाले. यात लष्कराचे 3 जवान बेपत्ता झाले. लष्कराने लगेच सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले.

 

हिमस्खलनावेळी पोस्टच्या आत होते जवान
- कुपवाडा जिल्ह्यात फॉरवर्ड पोस्टला अॅव्हलाँच धडकले. हे अॅव्हलाँच सोमवारी रात्री आले होते.
- अधिकारी म्हणाले, 20 डोगरा रेजिमेंटचे 2 जवान अॅव्हलाँच आले असताना पोस्टच्या आतच होते. ते बेपत्ता आहेत. जवानांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. यादरम्यान गुरेजमध्ये एक ओझे वाहणाऱ्या व्यक्तीचा डोंगरावरून पडून मृत्यू झाला. येथे हिमवर्षावामुळे डोंगरावरील पायवाट निसरडी झाली आहे.

 

गत जानेवारीत झालेल्या हिमस्खलनात झाली होती जीवितहानी 
- जानेवारी 2017 मध्येही कुपवाडा, बांदीपोरा, बारामुला, गांदेरबाल, कुलगाम, कारगिलमध्ये हिमस्खलनासाठी अलर्ट जारी करण्यात आले होते.
- जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अनेक हिमस्खलने झाली. यात 15 जवानांचा मृत्यू झाला होता, तर अनेक बेपत्ता झाले होते. 6 नागरिकांचाही मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...