आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदाराने वयाच्या 55व्या वर्षी दिली पदवीच्या प्रथम वर्षाची परीक्षा, म्हणाले- भविष्यात करणार पीएचडी!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर (राजस्थान) - उदयपूर ग्रामीणचे 55 वर्षीय आमदार फूलसिंग मीणा यांनी नुकतीच पदवीच्या प्रथम वर्षाची परीक्षा दिली आहे. 12वीनंतर शिक्षणात खंड पडल्यामुळे त्यांनी आता ते पूर्ण करण्याचा चंग बांधला आहे. 

 

भविष्यात करायची आहे पीएचडी!

आमदार फुलसिंग म्हणाले की, माझ्या मुलीने शिक्षण पूर्ण करण्याचा हट्ट धरला होता. परंतु मला आता ते शक्य होईल की नाही याची खात्री नव्हती. कारण आता माझे वय 55 वर्षे आहे. शेवटी मुलीच्या आग्रहामुळे मीही तयारीला लागलो आणि पदवीच्या प्रथम वर्षाची परीक्षा दिली. आता मी पदवी पूर्ण करणार असून भविष्यात मला पीएचडीसुद्धा करायची आहे.

 

अनेक राजकारणी अशिक्षित

भारताच्या राजकारणात अनेक नेते अंगठेबहाद्दर आहेत, काहींचे 4थी तर काहींचे 5वी पास शिक्षण झालेले असते. सरकारी नोकरीसाठी उच्चशिक्षण आवश्यक आहे, परंतु सरकार चालवण्यासाठी शिक्षणाची कोणतेही बंधन नाही. तथापि, आमदार फूलसिंह यांच्या उच्चशिक्षण पूर्ण करण्याच्या जिद्दीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos..

 

 

बातम्या आणखी आहेत...