आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तिसगडमध्ये Encounter: 2 जवान शहीद, 6 जण जखमी; एक नक्षलवादी ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - छत्तिसगडच्या सुकमा जिल्ह्यात रविवारी सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. यात दोन जवान शहीद झाले असून इतर 6 जवान जखमी आहेत. यासोबत एका नक्षलवाद्याला ठार मारण्यात यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, नक्षलींनी सकाळी 11 वाजता रस्ते बांधकामाच्या सुरक्षेसाठी तैनात जवानांवर अचानक हल्ला केला. त्यानंतर सुरक्षा रक्षक आणि नक्षलींमध्ये 5 तासांची चकमक उडाली. 

 

- वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नक्षलविरोधी मोहिमेचे डीजी डीएम. अवस्थी यांनी घटनेस अधिकृत दुजोरा दिला. त्यांनी सांगितले, एनकाउंटर सकाळी 11 वाजता सुरू झाले. यात एसटीएफ आणि डीआरजी का एक-एक जवान शहीद झाले. कॉन्स्टेबल मडकम हांडा आणि मुकेश कडती अशी त्यांची नावे आहेत. 
- एनकाउंटरमध्ये 6 जवान जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्वच जवानांना हेलिकॉप्टरने रायपूर येथील रुग्णायलायत उपचारासाठी दाखल करण्यात आले. 
- नक्षली गटाने सुकमा जिल्ह्यातील भेज्जी येथे जवानांवर हा हल्ला केला आहे. येथील चिंतागुफा परिसरात रस्त्याचे बांधकाम सुरू होते. त्याच्याच सुरक्षेसाठी तैनात सीआरपीएफ आणि पोलिस दलावर हल्ला करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...