आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking: अंडे फुटले म्हणून चिमुरडीला केले जातीबाहेर, पंचायतीचे फर्मान- बापाने आता विदेशी दारूने करावी भरपाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुंदी (जयपूर) - अवघी 6 वर्षांची खुशबू जुलैमध्ये पहिल्यांदा शाळेत गेली. त्याच दिवसापासून शाळेतील मुलांना दूध पिण्याची सोय करण्यात आली होती. दुधासाठी मुले रांगेत उभी राहिली तेव्हा त्यांचा पक्ष्याच्या अंड्यावर पाय गेला. एक अंडे फुटले... अन् वादळच आले. बूंदीच्या हरिपुरा गावात यावरून पंचायत बसली. चिमुरडीला मुक्या जिवाच्या हत्येचा दोषी ठरवत जातीबाहेर करण्याचे फर्मान सुनावण्यात आले. घराबाहेर टिनशेडमध्ये चिमुरडीला कडक उन्हात 10 दिवस काढावे लागले. ती रडली तरीही तिच्या आईला तिला हात लावण्याची परवानगी नव्हती. ही बातमी बुधवारी कलेक्टर-एसपींकडे पोहोचली तेव्हा त्यांनी पंचांवर दबाव टाकून चिमुरडीची घरवापसी करायला लावली. राज्य मानवाधिकार आयोगाने बूंदी-कलेक्टर एसपींना आता याबाबत रिपोर्ट मागितली आहे.

 

10 दिवस चिमुरडी अशी शिक्षा भोगत राहिली. गावकऱ्यांना आपल्या पातळीवर हे निपटायचे होते. परंतु माहिती मिळताच तहसीलदार, पोलिसांना लगेच कारवाईचे आदेश देण्यात आले.
- महेशचंद्र शर्मा, कलेक्टर

 

दिव्य मराठी विचार: एका निरागस मुलीच्या चुकीला एवढी मोठी शिक्षा
रडणाऱ्या मुलांना हसवणे हे ईश्वराच्या पूजेसमान मानले जाते. पंचांनाही ईश्वराचेच रूप म्हणतात. परंतु ईश्वर मुलांना रडवत नाही. हे असे कसे पंच आहेत जे एका चिमुरडीविरुद्ध उभे राहिले. त्यांनी त्यांची पूर्ण ताकद... एका चिमुरडीला रडवण्यासाठी लावली. 10 दिवस तिने जी पीडा भोगली ते पाहता या दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. असे उदाहरण बनावे समाजापुढे ज्यामुळे यापुढे जात-पंचायती कोणताही फैसला सुनावण्याआधी 100 वेळा विचार करतील. 

 

पंचांनी ठोठावलेला दंड: गायीसाठी चारा, स्वत:साठी विदेशी दारू
चिमुरडीला जातीबाहेर तर काढलेच, कहर म्हणजे पंचांनी चिमुकलीचे वडील हुकमचंद यांना दंडही लावला. म्हणाले, गायींना चारा, माशांना पीठ, कबूतरांना ज्वारी टाकावी... एक किलो मसाला चणे, एक किलो चिवडा आणि विदेशी दारूची बॉटल पंचायतीला द्यावी. तीन दिवसांनी पंचायत पुन्हा बसली, आता पंचांनी हुकूमचंदला हुकूम सोडला की, त्याने एका पंचाकडून काही वर्षांपूर्वी घेतलेले दीड हजार रुपये तत्काळ फेडावे.

 

आईला काळजी, माझ्यानंतर कोण पाहील...
खुशबूची आई 9 महिन्यांची गर्भवती आहे. खुशबूला या अवस्थेत पाहून ती दिवसरात्र काळजीत राहते, तिला काही झाले तर काय होईल? पोलिसांच्या दबावात येऊन पंचांनी तिला जातीत सामील तर केले, परंतु आता तिची डिलिव्हरी किंवा इतर कामांमध्ये समाजातील लोक कुटुंबावर बहिष्कार करतील. आता आमची मदत कोण करणा

र?

पंच म्हणाले- त्यांनी गावात पोलिसांना बोलावून इज्जत मातीत मिसळली
पंच समाजाचे औंकार, कालू, मोहन म्हणाले, पूर्वापार चालत आलेली परंपरा पाळली आहे. जीव हत्येवर समाजातील पंचायत काही दंड ठोठावते. जी पूर्ण केल्यानंतर परत जातीत सामील केले जाते. तीसुद्धा आमच्याच कुटुंबातील मुलगी आहे. आम्हालाही माहिती आहे, लहान मुलीसोबत असे होत नाही. चिमुरडीला महादेवापाशी अंघोळ घालून तिच्या हातून पंचांना गंगा जल पाजण्याचे, चणे, नमकीन, गायींना चारा टाकण्यासाठी सांगितले होते. चिमुकलीचा बाप दारुडा आहे, तो पंचांना शिवीगाळ करू लागला. आम्ही तर स्वत:हूनच तिला जातीत सामील करणार होतो. पण हुकूमचंदने पोलिसांना बोलावून समाजातील बड्या-बुजूर्गांची इज्जत मातीत मिसळली. समाजाची साथ पाहिजे असल्यास हे करायला पाहिजे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...