आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

65 वर्षीय मौलानाने 8 वर्षीय चिमुरडीवर केला रेप, ट्यूशनसाठी यायचा घरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरभंगा - बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात 65 वर्षीय एका मौलानाने 8 वर्षीय चिमुरडीवर रेप केला. घटना हायाघाट परिसरातील आहे. मौलाना मुलीच्या घरी ट्यूशनसाठी जायचा. मंगळवारी रात्री तो कोचिंगसाठी आला आणि बहाण्याने जवळ बोलावून मुलीवर रेप केला. पीडितेच्या कुटुंबीयांनी तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. तेथून तिला सरकारी रुग्णालयात रेफर करण्यात आले. पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे.

 

पोलिसांनी आरोपी मौलाना मो. मोजीबुर रहमान याला अटक केली आहे. पोलिस स्टेशन इंचार्ज दिलीप कुमार पाठक म्हणाले की, पीडितेच्या वडिलांच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीड़ितेचे वडील म्हणाले की, रोजच्याप्रमाणे मौलाना मंगळवारी रात्री 8 वाजता मुलीला शिकवण्यासाठी घरी आला होता.  तो मुलीला शिकवत असताना तेथे घरातील कोणताही सदस्य नव्हता. जवळजवळ तासाभरानंतर त्यांनी शिक्षकाला जाताना पाहिले. त्यादरम्यान चिमुरडीच्या रडण्याचाही आवाज आला. ती रक्तबंबाळ होऊन पडलेली होती. तिनेच मौलानाचे कृत्य घरच्यांना सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...