आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीर : धबधब्यात अंघोळ करणाऱ्यांच्या अंगावर दरड कोसळली, 7 ठार, 25 जख्मी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या रियासी भागात रविवारी दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला. तर 25 हून अधिक लोक जखमी झाले. ही दुर्घटना जम्मूच्या सेहर बाबा धबधब्यात घडली. एसपी ताहीर सजाद भट्ट यांनी सांगितले की, दुपारी काही लोक धबधब्याखाली अंघोळ करत होते. त्याचवेळी पावसामुळे एक दरड त्यांच्या अंगावर कोसळली. त्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी एकत्रितपणे मदतकार्य केले. अपघातातील पीडित वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात होते. 


सेहर बाबा धबधबा डोंगरांमध्ये चिनाब नदीवर आहे. रियासी शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. सौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये हा धबधबा प्रसिद्ध आहे. उत्तर भारतातील हा सर्वात मोठा धबधबा असल्याचे समजले जाते. सुट्यांमध्ये याठिकाणी हजारो लोक येत असतात. 

बातम्या आणखी आहेत...