आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाऊमिन खाताना पडला चमचा, उचलण्यासाठी वाकला अन् भरधाव आलेल्या कारने चिमुरड्याला चिरडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेगूसराय - बिहारमध्ये शुक्रवारी रात्री हेलावून टाकणारी घटना घडली. एका कारने 7 वर्षीय चिमुरड्याला चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. गंभीर जखमी मुलाला दवाखान्यात उपचारासाठी नेले पण त्याठिकाणी त्याचा मृत्यू झाला. मृत समस्तीपूर जिल्ह्याच्या धरहरवा गावातील पप्पू चौपाल यांचा मुलगा होता. त्याचे नाव होते आदर्श. 


मुलाच्या मृत्यूने लग्नघरात पसरली शोककळा 
आदर्श आई वडिलांबरोबर आजीच्या गावी एका लग्न सोहळ्यासाठी आलेला होता. त्याचे आजोबा रामाशीष तांती यांनी सांगितले की, शुक्रवारी सुमारे 8 वाजता आदर्श तीन मुलांबरोबर रस्त्यावरच्या गाडीवर चाऊमिन खात होता. तेव्हा त्याचा चमचा रस्त्यावर पडला. तो चमचा उचलण्यासाठी हा मुलगा वाकला तेव्हाच वेगाने येणाऱ्या डस्टर गाडीने त्याला चिरडले. घटनास्थळी उपस्थित नातेवाईक आणि प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांनी आरडा ओरडा केला पण गाडीचा चालक लगेच गाडी घेऊन फरार झाला. पण लोकांनी त्याला पाठलाग करून पकडलेच. 


आदर्शला (7वर्षे) दोन भाऊ आणि एक बहीण होती. तो सर्वात मोठा होता. 5 जुलैला त्याच्या आजीच्या घरी लग्न होते. त्यासाठी तो कुटुंबासह याठिकाणी आला होता. सगळ्यांचा लाडका असल्याने आजोबांनी त्याला काही दिवसांसाठी राहण्यासाठी ठेवून घेतले होते. आजोबाबरोबर तो आई वडिलांकडे जाणार होता, पण त्याआधीच काळाने घाला घातला. 

 

बातम्या आणखी आहेत...