आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70 वर्षांचा नवरदेव अन् 25 वर्षांची नवरी, 24 तासही टिकले नाही लग्न, मधुचंद्राच्या रात्रीच झाली हाणामारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजौरी, जम्मू - लग्नाच्या स्टेजवर एकमेकांना वरमाला घातल्यानंतर निवडणुकीला उभा राहण्याची घोषणा करणाऱ्या 70 वर्षीय नवरदेवाचे लग्न 24 तासही टिकले नाही. या नवरदेवाने 25 वर्षीय विधवेशी मंगळवारी लग्न केले होते. परंतु मधुचंद्राच्या रात्रीच दोघांचे भांडण झाले. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद मारहाणीपर्यंत विकोपाला गेला. आता दोघांनीही पोलिसांत आपापली तक्रार दाखल केली आहे.

 

- ही घटना जम्मू-काश्मीरच्या सुंदरबनीमधील योगीनाला भागातील आहे. येथील रहिवासी माजी सैनिक मोर सिंहच्या पत्नीचे 6 वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. सर्वांचे लग्न झालेले आहे.


- दुसरीकडे पुष्पाच्या पतीचे 2 वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. तिला 2 वर्षांचा एक मुलगाही आहे. काही महिन्यांपूर्वी या दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. दीड महिन्यांपूर्वीपासून ते लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागले होते.


- मंगळवारी त्यांनी लग्न केल्यानंतर अख्ख्या गावाला जेवण दिले होते.
- वरमाला घातल्यानंतर मोहर सिंहने स्टेजवरूनच विधानसभा इलेक्शनमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहण्याची घोषणा केली होती. स्वत:ला महिलांचा हितैषी मानणाऱ्या मोहर सिंहने भाषण देत म्हटले होते की, मागच्या सरकारला जे करता आले नाही, त्या सर्व सुविधा माझ्या परिसरात आणीन. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला होता.


- परंतु, मधुचंद्राच्या रात्री पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. दुसऱ्या दिवशी दोन्ही बाजूंची मंडळी एकमेकांशी भांडू लागली. नवरीचा आरोप आहे की, नवरदेवाच्या नातेवाइकांचा तिचे दागिने अन् पैशांवर डोळा आहे. गुरुवारी पोलिसांनी दोघांचेही जबाब नोंदवले असून पुढील कारवाई सुरू आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...