आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 70 वर्षीय पुजाऱ्याने 7 वर्षांच्या मुलीवर मंदिर परिसरात केला बलात्कार 70 Year Old Priest Wrong Move To 7 Year Old Girl

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कठुआची पुनरावृत्ती: 70 वर्षीय पुजाऱ्याने 7 वर्षांच्या मुलीवर मंदिर परिसरात केला बलात्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांच्या ताब्यात आरोपी पुजारी. दुसऱ्या फोटोत आईच्या कुशीत चिमुरडी. - Divya Marathi
पोलिसांच्या ताब्यात आरोपी पुजारी. दुसऱ्या फोटोत आईच्या कुशीत चिमुरडी.

अजमेर - वडिलांसोबत डोंगरावर बनलेल्या मंदिरात गेलेल्या एका 7 वर्षीय मुलीवर तेथे खाली बनलेल्या एका दुसऱ्या मंदिराच्या 70 वर्षीय पुजारीने दुष्कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला शांतता भंगाच्या आरोपावरून अटक करून कोर्टात हजर केले, तेथून जामीन मिळताच आरोपीला पुन्हा बलात्कार केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. आरोपीविरुद्ध प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (पॉक्सो) अधिनियमाअंतर्गत खटला दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अलवर गेट पोलिसांनी पीड़ित मुलीची वैद्यकीय तपासणी करून घेतली. पोलिस स्टेशन इंचार्ज हरिपाल सिंह यात तपास अधिकारी आहेत. पोलिस म्हणाले, एमपीच्या जबलपूर जिल्ह्यातील हिनौता खवरियां येथील रहिवासी सेवानंद ऊर्फ बलवंत सिंह ऊर्फ धोबीला याला अटक करण्यात आली आहे. 

 

असे आहे प्रकरण...
- आरोपी कल्याणीपुरा गावातील कालीचाट माता मंदिरात खाली बनलेल्या हनुमान मंदिराचा पुजारी आहे.
- पीड़ितेच्या वडिलांनी सांगितले की, ते आपल्या मुलीसोबत माता मंदिरात गेले होते. हे मंदिर उंचावर आहे. मुलगी खालच्या हनुमान मंदिरात थांबली होती.
- तेथे पुजारी सेवानंदने तिला आपल्या रूममध्ये घेतले. माता मंदिरातून परतल्यावर मुलगी आढळली नाही, तेव्हा तिचा शोध घेतला. पुजारी सेवानंद मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळला.
- वडिलांनी जेव्हा ही स्थिती पाहिली तेव्हा त्यांचा संयम सुटला, त्यांनी आधी मुलीला घरी सोडले आणि मग घरची माणसे आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन पुजाऱ्याला बेदम मारहाण केली. लगेच पोलिसांनाही पुजाऱ्याचे कृत्य कळवले.

 

40 वर्षांपासून आहे पुजारी; पोलखोल झाल्यावर गावकऱ्यांत संताप
- आरोपी सेवानंद मागच्या 40 वर्षांपासून अजमेरमध्ये राहतो. दीर्घकाळापासून तो या मंदिराचा पुजारी आहे.
- आरोपीचे कृत्य कळल्यावर कल्याणीपुरा गावातील गावकऱ्यांत प्रचंड संताप उसळला आहे.
- पोलिस हरिपाल सिंह म्हणाले की, आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी शोधण्यासाठी त्याच्या मूळ पत्त्यावर पोलिस पथक पाठवले आहे. शुक्रवारी आरोपीला कोर्टात हजर केले जाईल.

 

दिव्य मराठी- नॉलेज अॅड ऑन
> मुलींची छेडछाड, बलात्कार आणि अनैसर्गिक अत्याचार यासारख्या गुन्ह्यांपासून बालकांना सुरक्षा मिळावी म्हणून 2012 मध्ये पॉक्सो अॅक्ट बनवण्यात आला. या अॅक्टअंतर्गत अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार, छेडछाड प्रकरणांत कारवाई केली जाते. हा कायदा मुलांना सेक्सुअल हरॅसमेंट, सेक्सुअल असॉल्ट आणि पोर्नोग्राफी यासारख्या गंभीर गुन्ह्यांपासून सुरक्षा प्रदान करतो.

कलम-3 : पोस्को अॅक्टच्या कलम 3 अंतर्गत पेनेट्रेटिव्ह सेक्सुअल असॉल्टला परिभाषित करण्यात आले आहे. यात बालकाच्या शरीरासोबत ओंगळ कृत्य करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षेची तरतूद आहे.
कलम- 4 : बालकांवर बलात्कार वा अनैसर्गिक अत्याचार सिद्ध झाल्यास 7 वर्षांपासून ते जन्मठेप आणि आर्थिक दंडाची तरतूद आहे.
कलम - 6 : बालकांवर बलात्कारानंतर गंभीर दुखापत झाल्यास पॉक्सो अॅक्टच्या कलम-6 मध्ये प्रकरणाची नोंद होते. 10 वर्षांपासून ते आजीवन कारवासाची शिक्षा आणि दंड दोन्हींची तरतूद आहे.

कलम 7 व 8 : पॉक्सो अॅक्टचे कलम 7 व 8 अंतर्गत अशा प्रकरणांची नोद होते, ज्यात बालकांच्या गुप्तांगाशी छेडछाड केली जाते. यात आरोप सिद्ध झाल्यास आरोपीला 5 से 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे आणि दंड दोन्हींची तरतूद आहे.

 

काय आहे केस ऑफिसर स्कीम?
बलात्कार, हत्या, दरोडा, गोवंश हत्या सहित इतर गंभीर गुन्ह्यांत चालान सादर झाल्यानंतर केस ऑफिसर नियुक्त होतो. तोच वेळेवर साक्षी, साक्षीदारांना होस्टाइल होण्यापासून वाचवण्यासोबतच पीडित पक्षाचे जबाब नोंद करण्यात तत्परता बाळगून प्रकरणाच्या शीघ्र सुनावणीसाठी प्रयत्नरत राहतो.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, प्रकरणाचे संबंधित आणखी फोटोज...   

बातम्या आणखी आहेत...