आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

83 वर्षाच्या म्हाता-याने 30 वर्षीय तरुणीशी यामुळे केले लग्न, वरातीत जावईही नाचले!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करोली/जयपूर - राजस्थानात 83 वर्षांच्या ज्येष्ठ व्यक्तीने वंशाला दिवा मिळण्याच्या लालसेपोटी 30 वर्षांच्या मुलीशी लग्न थाटले आहे. विशेष म्हणजे पत्नीने त्यासाठी या म्हाताऱ्याला परवानगी दिली. सुखराम बैरवा असे या नवरदेवाचे नाव आहे. त्याची वरात अगदी वाजत गाजत नवरीच्या घरी पोहोचली. 53 वर्षांनी लहान असलेल्या मुलीबरोबरच्या या लग्नात समाजातील पंच आणि नातेवाईकांची उपस्थिती होती. 


जावई, नातवंडेही वरातीत नाचले 
- सैंमरदा गावात बँड बाजाच्या गजरात 83 वर्षांचा नवरदेव पारंपरिक पद्धतीने लग्नाच्या वरातीत निघाला. 
- गावातील महिलांनी गाणी म्हटली, नवरदेवाच्या चेहऱ्यावरही आनंद मावेनासा झाला होता. 
- त्याचप्रमाणे मुलीचे गाव असलेल्या राहीरमध्ये थाटात सर्व विधी झाले. वरातही वाजत गाजत निघाली. 
- विशेष म्हणजे नवरदेवाच्या मुली, जावई आणि नातवंडेही वरातीत सहभागी झाले. 
- लग्नात सर्व विधींसह 12 गावातील लोकांना पंगतीत मेजवानी देण्यात आली. 
- रविवारी राहीरहून नवरीला निरोप देण्यात आला. दुसरी पत्नी रमेशी हिचे पहिल्या पत्नीने स्वागत केले. 


पाहण्यासाठी झाली गर्दी 
- या अनोख्या लग्नाचा विषय संपूर्ण आसपासच्या परिसरात होता. मुलगा व्हावा म्हणून सुखराम बैरवा याने हे दुसरे लग्न केले. 
- या जोडीला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. 
- पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुली आणि एक मुलगा होता. त्यांच्या मुलींचे खूप पूर्वीच लग्न झाले होते. पण आजारपणामुळे त्यांचा एकुलता एख मुलगा कान्हूचा 30 व्या वर्षी मृत्यू झाला होता. त्यामुळे वंश पुढे कसा वाढेल याची सखाराम यांचा काळजी होती. 
- त्यामुळे सखाराम यांनी 30 वर्षांच्या रमेशी हिच्याशी लग्न घेतले. 


पहिली पत्नी म्हणाली, वारसदार हवा 
वृद्ध सुखराम आणि पहिली पत्नी बत्तो बैरवा यांनी सांगितले की, त्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे. ती सांभाळण्यासाठी वारसदार पाहिजे. त्यासाठीच हे दुसरे लग्न करण्यात आले. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS

 

बातम्या आणखी आहेत...