आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

85 वर्षीय BJP नेत्याला तरुणीसह लॉजमध्ये पकडले; मुलगी, पत्नीच्या नावे करायचा बुकिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमशेदपूर - झारखंड पोलिसांनी एका कुप्रसिद्ध लॉजवर टाकलेल्या धाडीत 85 वर्षीय BJP नेता बिल्टू साव याला अटक केली आहे. तो एका कॉलेजच्या विद्यार्थिनीसोबत या लॉजमध्ये थांबला होता. यासोबतच पोलिसांनी लॉज मालक सौरभ जैसवालला सुद्धा पकडले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास त्यांनी लॉजवर धाड टाकली तेव्हा भाजपचा ज्येष्ठ नेता आणि तरुणीसह पकडला गेला आहे. 


तरुणीकडून पोलिसांत तक्रार दाखल
या प्रकरणात सापडलेल्या 21 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने भाजप नेत्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. शनिवारी रात्री 8 च्या सुमारास दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीत तिने भाजप नेत्यावर फूस लावून लॉजवर बोलावण्याचे आरोप लावले. तिने सांगितल्याप्रमाणे, भाजप नेता तिच्या सारख्या इतर तरुणींना सुद्धा मदत करण्याच्या बहाण्याने लॉजवर बोलवायचा आणि त्यांच्यावर बलात्कार करायचा. पोलिसांनी लॉज मालक आणि नेता अशा दोघांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. 

 

कभी मुलगी, तर कधी पत्नीच्या नावे बुकिंग
पोलिसांनी केलेल्या चौकशीनुसार, अटक करण्यात आलेला नेता बिल्टू साव झारखंड येथील 'बिहार लॉज'चा रेगुलर कस्टमर होता. त्याने यापूर्वी लॉजमध्ये अनेक वेळा खोल्या बुक केल्या होत्या. 6 जुलै रोजी खोली क्रमांक 201 बुक करून तो एका तरुणीला घेऊन आला होता. त्याने ही तरुणी आपली पत्नी असल्याची रेजिस्टरवर नोंद केली होती. यानंतर 7 जुलैला सुद्धा तो एक तरुणी घेऊन गेला. यावेळी त्याने ही आपली मुलगी असल्याची नोंद केली होती. वेळोवेळी बनावट नावे लिहून तो सह्या सुद्धा बनावट करायचा. 


सुटकेसाठी पोहोचले नगर परिषद अध्यक्ष
भाजप नेत्याच्या अटकेची माहिती मिळताच पोलिस स्टेशनवर स्थानिक नेत्यांनी गर्दी केली. विविध फोन कॉल्स आणि प्रयत्न करून काही जमले नाही तेव्हा नगर परिषद अध्यक्ष के.डी. शहा त्यांची बाजू घेण्यासाठी पोलिसांकडे पोहोचले. पोलिस आणि मीडिया मॅनेज करण्यासाठी स्थानिक नेत्यांचे खलबते सुरू होते. 


यापूर्वी छेड काढल्याने झाली होती धुलाई
बिल्टू सावचे नाव वादात सापडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही एका तरुणीची छेड काढल्याने स्थानिकांनी त्याची भर रस्त्यावर धुलाई केली होती. त्याच्या कारनाम्यांमुळे त्याचे कुटुंबीय सुद्धा वैतागले आहेत. तो गुगडी बाजाराच्या आखाडा समितीचा अध्यक्ष आहे. स्थानिक कॉलेजच्या काही तरुणी देहविक्रयात असल्याचे चौकशीत समोर आल्या. त्या तरुणींच्या सुद्धा हा नेता संपर्कात होता.


काय म्हणाला आरोपी?
भाजपचा माजी नगर कोषाध्यक्ष बिल्टू सावने सांगितल्याप्रमाणे, "मी लॉजमध्ये नव्हतो. पोलिसांनी माझ्यावर खोटे आरोप लावले आहेत. लॉजच्या शेजारी असलेल्या फळ विक्रेत्याला मी पैसे देण्यासाठी गेलो होतो. त्याचवेळी अचानक पोलिस आले आणि मला अटक केली. मी काहीच वाईट केलेले नाही."

 

बातम्या आणखी आहेत...