आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1035 वर्षांच्या बाहुबलीचा 88 वा सोहळा; 19 दिवसांचा उत्सव, 585 कोटी खर्च होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नाटकच्या हासन जिल्ह्यात विंध्यगिरी पहाडावरील बाहुबलीच्या मूर्तीचे हे छायाचित्र ड्रोनच्या मदतीने घेतले आहे. त्यासाठी विशेष परवानगी घेण्यात आली आहे. - Divya Marathi
कर्नाटकच्या हासन जिल्ह्यात विंध्यगिरी पहाडावरील बाहुबलीच्या मूर्तीचे हे छायाचित्र ड्रोनच्या मदतीने घेतले आहे. त्यासाठी विशेष परवानगी घेण्यात आली आहे.

बंगळुरू- छायाचित्र कर्नाटकच्या श्रवणबेळगोळचे आहे. तेथे विंध्यगिरी पर्वतावर जैनांचे दैवत बाहुबलीच्या ८८ व्या मस्तकाभिषेकाची तयारी पूर्ण झाली आहे. हा सोहळा दर १२ वर्षांनी होतो. यंदा ७ ते २५ फेब्रुवारीपर्यंत महोत्सव चालेल. या वेळी १०३५ वर्षे जुन्या या मूर्तीला दूध, दही, तूप, केशर, सोन्याच्या नाण्यांसह अनेक पवित्र वस्तूंनी अभिषेक केला जातो. मागचा अभिषेक २००६ मध्ये झाला होता.


जगभरातून ३० लाख लोक येतील, त्यांच्यासाठी ११ शहरे वसवली
- महामस्तकाभिषेकासाठी ३० लाख लोक येतील, अशी अपेक्षा. त्यांच्यासाठी ११ शहरे वसवली आहेत. त्यावर १७५ कोटी रु. खर्च आला. त्याशिवाय जवळची सर्व हॉटेल बुक आहेत.
- संतांसाठी त्यागीनगर बनवले आहे. महोत्सव भव्य व्हावा यासाठी देशभरात ४० समित्या स्थापन झाल्या आहेत. उपचारासाठी एक सुपर मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उघडले आहे.
- महोत्सवासाठी पहिल्या दिवशी १०८ कलशांनी अभिषेक होईल. नंतर १००८ कलशांनी अभिषेक होईल.
- हजारो लिटर दूध, दही, केशर व इतर सामग्रीने भगवान बाहुबलींचा अभिषेक होतो. त्यामुळे पुतळ्याचे नुकसान होऊ नये म्हणून विशेष रसायनाचा थर दिला आहे.
- मंदिरात जाण्यासाठी ६१८ पायऱ्या आहेत. जे चढू शकत नाहीत त्यांच्यासाठी पालख्या.
- महोत्सवात १७ प्रकारची भोजनगृहे तयार केली जात आहेत. त्यात प्रत्येक राज्याचे भोजन मिळेल. रोज सुमारे एक लाख लोकांचे भोजन तयार होईल.
- ५ हजारपेक्षा जास्त सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातील. त्याशिवाय विविध सामाजिक संस्थांचे हजारो स्वयंसेवकही असतील.
- आयोजनावर ५८५ कोटी रु. खर्चाचा अंदाज. गेल्या वेळी ११६ कोटी रु. खर्च झाले होते.


प्लॅटफॉर्मसाठी जर्मनीहून मागवले ४५० टन साहित्य
- मूर्तीजवळ प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी जर्मन तंत्रज्ञान आणि साहित्य मागवले आहे. मंचावर एका वेळी ६ हजार लोक पूजेत सहभागी होऊ शकतील.
- मंचासाठी ४५० टन साहित्य जर्मनीहून गुजरात बंदरात मागवले गेले. तेथून श्रवणबेळगोळला आणले. त्यासाठी १२ कोटी रु. खर्च.
- मंचावर पोहोचण्यासाठी ३ एलिव्हेटर्स बनवले आहेत. दोन भाविकांसाठी आहेत. एक महाभिषेक साहित्य पोहोचवण्यासाठी असेल.
- प्लॅटफॉर्म बीममध्ये नट-बोल्ट जोडण्यासाठी रिंग अँड लॉक या तंत्रज्ञानाचा वापर. मंदिराचे नुकसान होऊ नये हा हेतू.

बातम्या आणखी आहेत...