आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस पित्याला मुलीचा फोन; घरी या किंवा नका, पण बलात्काऱ्याला फाशीपर्यंत पोहोचवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाडमेर - 22 जूनला एका 8 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार आणि तिच्या मृतदेहाच्या विटंबनेचा प्रकार घडला होता. या घटनेचा तपास करणारे पोलिस अधिकारी पुष्पेंद्र वर्मा यांना त्यांची मुलगी प्रणिकाने उदयपूरहून फोन केला. तुम्ही आता घरी या किंवा नका येऊ, पण त्या नराधमाला फाशीपर्यंत नक्की पोहोचवा असे प्रणिका तिच्या वडिलांना फोनवर म्हणाली. प्रणिका उदयपूर सेंट्रल अॅकेडमी स्कूलच्या नववीच्या वर्गात शिकते.


वडिलांना काय म्हणाली प्रणिका 
वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची मुलगी त्यांना फोनवर म्हणाली की, मला विश्वास आहे तुम्ही जे ठरवता ते करताच. पुरावे गोळा करण्यासाठी अगदी दिवस रात्र काम करा, खिशातून पैसे खर्च करा, पण एका एखा मुद्द्याता तपास करून पुरावे मिळवा. कोणत्याही परिस्थितीत आरोपीला फाशी व्हायला हवी. गरी सर्वकाही ठिक आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्हाला तुम्हाला भेटायचे आहे, पण या घटनेनंतर माझ्या मनात अनेक प्रश्न आले. लोक असे का करतात? यावर काहीच उपाय नाही का? या घटनेने सगळेच घाबरले आहेत. त्यामुळे मलाही नजरेआड होऊ देत नाहीत. 


असे होते प्रकरण.. 
एक नराधमाने 22 जून रोजी आजीकडे आलेल्या एका 8 वर्षीय चिमुरडीवर अत्यंत निर्घृणपणे अत्याचार केले होते. मामाच्या लग्नासाठी ती आलेली होती. संधी साधून आरोपी घरात घुसला आणि मुलीला तोंड दाबून उचलून नेले. त्यानंतर घरापासून जवळपास 100 मीटर अंतरावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. चिमुरडीचा ओरडण्याचा आाज ऐकून एक व्यक्ती उठला होता. पण रात्रीच्या अंधारामुळे तो बाहेर पडला नाही. त्यानंतर आरोपीला गळा दाबून तिची हत्या केली आणि मृतदेह दूर फेकला. बलात्कार आणि हत्येनंतर त्या नराधमाने मुलीच्या मृतदेहाची विटंबनाही केली. 

बातम्या आणखी आहेत...