आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 9 To 14 Year Old 5 Boys Gangraped A 8 Year Old Girl After Watching Porn In Dehradun Latest News

9 ते 14 वर्षे वयाच्या मुलांनी पाहिला पॉर्न व्हिडिओ, 8 वर्षीय चिमुरडीवर केला सामूहिक बलात्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देहरादून - शहरात 9 ते 14 वर्षे वयाच्या 5 मुलांनी एका 8 वर्षीय चिमुरडीवर गँगरेप केल्याची घटना उजेडात आली आहे. या मुलांनी दोन दिवसांपूर्वी मोबाइलवर पॉर्न व्हिडिओ पाहिल्यानंतर हे कृत्य केले. आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी बालसुधारगृहात पाठवले आहे.

 

असे आहे प्रकरण

सूत्रांनुसार, ही घटना गुरुवारी देहरादूनच्या सहसपूर परिसरात घडली. शुक्रवारी पोलिसांना तक्रार देण्यात आली, यानंतर पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.

 

पूर्ण प्लॅनिंग करून केला बलात्कार

सहसपूर पोलिस स्टेशनचे प्रभारी नरेश राठोड म्हणाले की, या मुलांनी दोन दिवसांपूर्वी पॉर्न व्हिडिओ पाहिल्यानंतर पूर्ण प्लॅनिंग केली होती. पीड़िता त्यांच्याच गल्लीत राहत होती. या मुलांना माहिती होते की, चिमुरडी कोणत्या वेळी घरी एकटीच असते. घटनेच्या दिवशी चिमुरडी आपल्या घरासमोर खेळत होती. तेव्हा आरोपींनी तिला बहाण्याने आरोपींपैकी एकाच्या घरी नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

 

काय म्हणतात पोलिस?

राठोड म्हणाले की, पोलिसांनी रविवारी मुलांना अटक करून पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांना ज्युवेनाइल कोर्टासमोर हजर केले गेले. येथून त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. पीड़ित चिमुरडीच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी photos...  

 

 

बातम्या आणखी आहेत...