आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 96 वर्षे वयात या महिलेने घेतला शिक्षणाचा ध्यास, यंदा इयत्ता चौथीत घेतले अॅडमिशन 96 Year Old Woman From Kerala Enrolled For Class 4 Not Too Old To Study

96 वर्षे वयात या महिलेने घेतला शिक्षणाचा ध्यास, यंदा इयत्ता चौथीत घेतले अॅडमिशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क/अलप्पुझा - भारतातील 100 टक्के साक्षर म्हणून ओळख असलेले राज्य केरळच्या अलप्पुझा जिल्ह्यातील रहिवासी 96 वर्षीय कर्थयायनी अम्मा साक्षरता अभियानाअंतर्गत चौथ्या वर्गात प्रवेश घेत आहेत. त्यांनी 10वीपर्यँत शिक्षण घेण्याचा ध्यास घेतला आहे. त्यांना सर्वात वयोवृद्ध विद्यार्थी मानले जात आहे.

 

इंग्रजीही शिकणार अम्मा
- स्थानिक माध्यमांनुसार, जानेवारी 2018 मध्ये चेप्पड ग्रामपंचायतीच्या साक्षरता टीम सरकार द्वारे ज्येष्ठांसाठी लक्षम वेदू कॉलोनी बनवण्यात आली होती. कॉलोनीत राहणाऱ्या बहुतांश वृद्ध महिलांनी या साक्षरता अभियापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, परंतु कर्थयायनी अम्मा यांनी मात्र या अभियानाशी जोडायला आनंदाने होकार दिला.
- सध्या अम्मा मॅथेमॅटिक्सचे शिक्षण घेत आहेत. 3 पर्यंतचे पाढे आठवण्याचा त्यांचा अभ्यास सुरू आहे. याशिवाय त्या मल्याळममधील वर्णमालाही शिकत आहेत. येणाऱ्या शैक्षणिक वर्षात अम्मा इंग्रजीही शिकणार असून या भाषेचा त्यांच्या कोर्समध्ये समावेश केला जात आहे.

 

मुलीकडून घेतली प्रेरणा
अम्मा सांगतात की, त्यांनी शिक्षणाचा ध्यास काही वर्षांपूर्वी घेतला. एकदा त्यांनी आपली कन्या अम्मिनी अम्माला वाचताना पाहिले. अम्माच्या मुलीने 60 वर्षे वयात साक्षरता अभियानाचा कोर्स पास केला. साक्षरता अभियानाचा हा कोर्स इयत्ता 10वीच्या पारंपरिक शिक्षणाच्या बरोबरीचा आहे. अम्माच्या या पुढाकारानंतर इतर आणखी 30 वृद्धांनी या कोर्ससाठी आपली नावे दिली आहेत.

 

12 वर्षे वयात सोडले होते शिक्षण
कर्थयायनी अम्माचे वडील शिक्षकच होते. तरीही त्या आणि त्यांच्या बहिणीने 12 वर्षे वयात शिक्षण सोडले होते. त्या दोघीही घराजवळील एका मंदिरात काम करत होत्या.
अम्मांच्या या जिद्दीमुळे शिक्षणाला वयाची गरज नाही, हेच प्रकर्षानं अधोरेखित होतं. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...