आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 99 YEAR OLD ACCUSED OF PHYSICALLY ABUSING A 10 YEAR OLD GIRL CASE REGISTERED IN CHENNAI

99 वर्षीय निवृत्त प्राचार्याने 10 वर्षीय चिमुरडीचे केले लैँगिक शोषण, चेन्नई पोलिसांनी केली अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - पोलिसांनी सरकारी शाळेतून निवृत्त 99 वर्षीय प्राचार्याला 10 वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक केली आहे. आरोपी के. परशुरामन 7 मुलांचा बाप असून त्याला 5 मुली आणि 2 मुले आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपीची स्वत:च्या मालकीची 5 घरे आहेत.  ही घरे तो किरायाने देतो. पीडित चिमुरडी तिच्या आईवडिलांसोबत यातीलच एका घरात किरायाने राहतात. एका दिवशी चिमुरडीने आईवडिलांना पोटात दुखत असल्याचे सांगितले. 

आईवडिलांनी विचारल्यावर तिने सांगितले की, घरमालकाने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले आहे.
पोलिस म्हणाले की, आईवडिलांच्या तक्रारीवरून निवृत्त प्राचार्याविरुद्ध शनिवारीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने चौकशीत आपला गुन्हा कबूल केला आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...