आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

80 वर्षांत येथे प्रथमच निघाली दलिताची वरात, VVIP सारख्या सुरक्षेत 300 पोलिस तैनात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कासगंज, युपी - देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात प्रथमच निजामपूर गावात एखाद्याला वरात काढण्याचे स्वातंत्र्य मिळाले. पण हा लढा स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे. हे गाव 80 वर्षे जुने आहे. गावातील हे लग्न व्हावे यासाठी संपूर्ण प्रशासनाला मैदानात उतरावे लागले. 300 हून अदिक पोलिस कर्मचारी वरातीत सुरक्षेसाठी तैनात होते. 6 महिन्यांपासून ठाकूर आणि दलितांमधील वादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. 

 

- रविवारी निजामपूर गावात इतिहास रचला गेला. गावातील शीतल हिच्याशी विवाहासाठी सिकंदराबादच्या बसई गावातील संजय जाटव(27) घोडा बग्गी सह वरात घेऊन आला. 
- या गावातील ठाकुरांचा दलितांनी वाजत गाजत मिरवणूक काढण्यास विरोध आहे. पण नवरदेवही अडून होता. ही क्रूर परंपरा बदलावी अशी त्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने प्रशासनाशी संपर्क साधला. 


- वरातीसाठी प्रशासनाने मार्ग तयार केला. वराज जाणार्या रस्त्यावरील घरांच्या छतांवरक पोलिस तैनात करण्यात आले. 
- वरातीबरोबर 10 इन्स्पेक्टर, 22 सब इन्स्पेक्टर, 35 हेड कॉन्स्टेबल, 100 कॉन्स्टेबल आणि पीएसीची एक प्लाटूनही होती. एखाद्या VVIP च्या लग्नासारखा हा नजारा होता. उपजिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मोठे अधिकारीही याठिकाणी उपस्थित होते. 
- नवरीची आई मधुबालाने सांगितले की, यापूर्वी तिच्या तीन नणंदांच्या लग्नात वरातीवेळी गावातील ठाकुरांनी रस्ता अडवून गोंधळ घातला होता. 

बातम्या आणखी आहेत...