आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • योग दिन: मोदी देहरादूनमध्ये म्हणाले जेव्हा समाज तोडणाऱ्या शक्तींचा प्रभाव वाढतो, तेव्हा योग जोडण्याचे काम करतो 4th International Yoga Day News And Updates

योग दिन: मोदी म्हणाले- समाज तोडणाऱ्या शक्तींचा प्रभाव वाढतो, तेव्हा योग जोडण्याचे काम करतो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
VIDEO: पंतप्रधान मोदी म्हणाले, योगाने विश्वाला इलनेस ते वेलनेसचा मार्ग दाखवला. - Divya Marathi
VIDEO: पंतप्रधान मोदी म्हणाले, योगाने विश्वाला इलनेस ते वेलनेसचा मार्ग दाखवला.

- ​देहरादूनमध्ये मोदींसोबत 50 हजार लोकांनी योग केल्याचा दावा

- मोदींनी 2015 मध्ये दिल्लीत, 2016 मध्ये चंदिगडमध्ये, 2017 मध्ये लखनऊत योगदिन साजरा केला होता.


नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चौथ्या आंतरराष्ट्रीय योगदिनी गुरुवारी देहरादूनच्या वन अनुसंधान केंद्राच्या मैदानावर योगाभ्यास केला. येथे तब्बल 50 हजार जणांनी एकत्र योग केल्याचा दावा करण्यात आला. मोदींनी योगाचे महत्त्वही सांगितले. ते म्हणाले की, आज देहरादूनपासून ते डब्लिनपर्यँत योग पूर्ण जगाला जोडत आहे. जेव्हा तोडणाऱ्या शक्ती वरचढ ठरतात, समाज विस्कळीत होतो. व्यक्ती आतल्या आतच मोडून जातो. जीवनात तणाव वाढतो. या विस्कळीतपणामध्ये योग जोडण्याचे काम करतो.
पंतप्रधान म्हणाले, "आपण आपल्या या वारशावर गर्व केला, तर विश्व आपल्यावर गर्व करेल. संयुक्त राष्ट्रात सर्वात कमी कालावधीत स्वीकारला जाणारा प्रस्ताव योगदिनाचा आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. योगामुळे जगाला इलनेसपासून ते वेलनेसचा मार्ग दाखवला. राष्ट्रनिर्माणाच्या कोणत्याही प्रक्रियेशी जोडण्यासाठी सर्वांचे आरोग्य चांगले राहणे आवश्यक आहे. यात योगाचे मोठे योगदान आहे.’’

 

योग जीवनाला समृद्ध करत आहे :

मोदी म्हणाले, "जे लोक योगाशी जोडले आहेत, त्यांनी यात निरंतरता आणावी आणि जे जोडलेले नाहीत, त्यांनी याच्याशी जोडून घ्यावे. योगानेच भारत आणि विश्वामध्ये जवळीकता आली आहे. योग आज जगातील सर्वात पॉवरफुल युनिफाइंग फोर्सेसपैकी एक बनले आहे. आपणा सर्वांसाठी ही गर्वाची बाब आहे की, आज जेथे-जेथे उगवत्या सूर्याची किरणे पोहोचत आहेत, प्रकाशाचा विस्तार होत आहे, तेथील लोक योगानेच सूर्याचे स्वागत करतात. हिमालयाची हजारो फूट ऊंच शिखरे असोत वा गरमीने तप्त वाळवंट असो, योग प्रत्येक परिस्थितीत जीवनाला समृद्ध करत आहे.’’  

 

योगाला पूर्ण जगाने स्वीकारले: 
पंतप्रधान म्हणाले, "आजच्या धावपळीच्या जगात योग मन, शरीर, बुद्धी आणि आत्मा जोडून व्यक्तीला शांततेची अनुभूती देत आहे. समाजात सद्भाव वाढवत आहे. समाज राष्ट्राच्या एकतेचे सूत्र बनत आहे. असे समाज हे देशात शांततेचे संचालन करतात. योग संपूर्ण मानवतेला जोडतो. विश्वातील प्रत्येक नागरिक, विश्वातील प्रत्येक देश योगाचा स्वीकार करू लागला आहे. आम्हा हिंदुस्थानींसाठी एक मोठा संदेश आहे की, आपण या महान परंपरेचे पाईक आहोत.’’

 

योग आरोग्य विम्याचा पासपोर्ट : 
पंतप्रधानांनी बुधवारी जगभरातील योगप्रेमींचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘"योग फक्त व्यायाम नाही, तर ती शरीराला तंदुरुस्त ठेवण्याची शैली आहे. हा आरोग्य विम्याचा पासपोर्ट, तंदुरुस्ती आणि आरोग्याचा मंत्र आहे. योग फक्त सकाळी केलेली कसरत नाही आहे. निष्ठेने तुमची दिनचर्या आणि पूर्ण जागरूकताही योग आहे.'’

 

नौसेनेच्या 4 युद्धपोतांवर साजरा झाला योगदिन : 
अमेरिकेच्या हवाई परिसरात उपस्थित नौसेनेच्या युद्धपोत आयएनएस सह्याद्रीवर नौसैनिकांनी योगाभ्यास केला. याप्रकारे आयएनएस विराट, बंगालच्या खाडीतील आयएनएस ज्योती आणि अरबी समुद्रातील आयएनएस यमुनावरही नौसैनिकांनी योग केला. आयटीबीपीच्या जवानांनी हिमालयातील बर्फाळ डोंगरांवर आणि अरुणाचलच्या लोहितपुरमध्ये दिगरू नदीच्या वाहत्या पाण्यात उभे राहून योगासने केली.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...