आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजमशेदपूर (झारखंड) - शहरातील बर्मामाइन्स दास वस्तीत बुधवारी संध्याकाळी 5 वर्षीय बालिकेची बलात्कारानंतर गळा चिरून हत्या करण्यात आली. टाटा स्टीलच्या एका रिकाम्या क्वार्टरमध्ये हत्येनंतर मृतदेहाला डस्टबिनमध्ये टाकून झाकण्यात आले.
> घटनास्थळ बर्मामाइन्स पोलिस स्टेशनच्या अगदी जवळ आहे. मृत बालका संध्याकाळी 4 वाजता घराच्या बाहेर अंगणात खेळत होती. त्यानंतर ती गायब झाली. नराधमांनी चिमुकलीवर तिच्या घरापासून केवळ 10 पावले अंतरावरील एका रिकाम्या क्वार्टरमध्ये बलात्कार करून गळा चिरून हत्या केली. ती बर्मामाइन्सच्या आंगणवाडीत नर्सरीमध्ये शिकत होती.
> संध्याकाळी उशिराही ती घरी परतली नाही म्हणून घरच्यांनी खूप शोध घेतला, परंतु ती आढळली नाही. रात्री अंदाजे 11 वाजता वस्तीतील लोकांनी रिकाम्या क्वार्टरमध्ये शोध घेतला, तेव्हा डस्टबिनमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळला. यानंतर तेथे गर्दी जमा झाली.
> या अमानवीय घटनेमुळे वस्तीतील नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. इकडे, मुलीचा मृतदेह पाहून आईची शुद्ध हरपली. स्थानिकांनी पाणी शिंपडून त्यांना शुद्धीवर आणले. शुद्धीवर येताच मृत चिमुकलीच्या आईने मोठा आकांत केला.
सूचना मिळताच बर्मामाइन्स पोलिस स्टेशनची कुमक तेथे पोहोचली. त्यांनी घटनास्थळाची तपासणी केली. मृतदेह पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आला. रात्री उशिरापर्यंत आरोपींची ओळख पटू शकली नव्हती. पोलिसांच्या मते, आरोपी लवकरच पकडले जातील. मृत बालका 6 भावंडांत सर्वात लहान होती.
व्हिडिओ: सत्येंद्र कुमार.
पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित फोटोज व व्हिडिओ...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.