आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 6 Year Old Son Brutally Killed By His Mother In Punjab Bathinda News And Updates

पोटच्या मुलाची भोसकून हत्या करणारी आई म्हणाली- राग आला होता, अंत्यसंस्कारात रडली अख्खी गल्ली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भटिंडा (पंजाब) - पोटच्या 6 वर्षांच्या मुलाला धारदार शस्त्राने भोसकून निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आईला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी महिलेच्या माहेरच्यांनी कोर्टात राजवीर कौरची मेडिकल ट्रिटमेंट दाखल करण्याची याचिका दाखल केली होती, जी कोर्टाने रिजेक्ट केली. दुसरीकडे, पोलिसांना घटनेच्या 30 तासांनंतरही हरकिरत सिंह ऊर्फ हेवीच्या हत्येच्या कारणांचा शोध लागू शकलेला नाही. रविवारी चिमुरड्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. 

 

आरोपी आईचा भाऊ म्हणाला- मुलावर जीवापाड प्रेम करत बहीण...
- तपास अधिकारी एसआय हरनेक सिंह म्हणाले की, आरोपी महिलेची दीर्घ काळ चौकशी केली, परंतु ती सारखी एकच बाब म्हणत होती की, मला राग आला होता, हे सगळे कसे घडले कळले नाही. तपास अधिकारी म्हणाले की, अवैध संबंधांच्या पैलूवरही तपास करण्यात आला, परंतु तशी कोणतीही बाब समोर आलेली नाही.
- महिलेचा भाऊ सुखवीर सिंह म्हणाला, बहीण राजवीर कौर मुलगा हरकिरतवर एवढे प्रेम करत होती की, ती जेव्हा 15 दिवसांपूर्वी दिल्लीला आली होती, तेव्हा आपल्यासोबत पीठ आणि तवा घेऊन आली होती. कारण गव्हाची भाच्याला अॅलर्जी असल्याने त्याच्यासाठी स्पेशल जेवण तयार करायची.
- भाऊ म्हणाला, एक आई आपल्या मुलावर जिवापाड प्रेम करते, मग ती एवढ्या निर्घृपणे हत्या कशी करू शकते. आम्हा सगळ्यांनाच या घटनेने मोठा धक्का बसला आहे.

 

अंत्यसंस्कारात रडली अख्खी गल्ली
- रविवारी चिमुरड्यावर अंत्यंस्कार पार पडले. यादरम्यान लोकांची मोठी गर्दी जमली होती. प्रत्येक जण हेच म्हणत होता की, हेवी खूप चांगला मुलगा होता. तो घरात कमी, बाहेरच जास्त राहत होता. पूर्ण गल्लीचा तो लाडका होता. खूनी आईने आमच्यापासून हेवी हिरावून घेतला. चिमुरड्याला शेवटचे प्रत्येकाला पाहायचे होते. अंत्यसंस्कारात प्रत्येकाच्याच डोळ्यात या दुर्दैवी मृत्यूमुळे अश्रू तरळले.
- शेजारी म्हणाले- राजवीर एक क्षणही हेवीला दूर करत नव्हती. लग्नानंतर 6 वर्षांनी नवससायास करून तो जन्मला होता. तो या घराचा एकुलता एक वंशाचा दिवा होता.

 

काय घडलं हत्येच्या दिवशी?
- चिमुरडा हरकिरत सिंग ऊर्फ हेवी शहरातील लॉर्ड रामा पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता पहिलीत शिकत होता.
- पंजाब अॅग्रो इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनमधून मॅनेजर पदावरून निवृत्त झालेले बालकाचे आजोबा गुरचरण सिंग म्हणाले, ही घटना रविवारी सकाळी 10 वाजेदरम्यान घडली. ते आणि त्यांचा मुलगा परमिंदर कार वॉश करत होते. त्यांना हेवीला सोबत फिरायला न्यायचे होते. सून राजवीर कौर त्याला अंघोळीसाठी बाथरूममध्ये घेऊन गेली, परंतु तो अंघोळीला नकार देत होता. काही वेळाने अचानक त्याच्या रडण्याचा आवाज बंद झाला. यादरम्यान राजीवरने स्वत: बाहेर येऊन सांगितले की, तिने हेवीचा खून केला आहे.


- घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी हत्येची आरोपी आई राजवीर कौर हिला ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा ती जोरजोरात ओरडून म्हणू लागली की, मला माझ्या बाळाला भेटू द्या, तो ठीक आहे. मी त्याला नाही मारलं.
- तथापि, प्रत्यक्षदर्शी सांगतात की, राजवीरच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चात्ताप नव्हता. हत्येची माहिती मिळाल्यानंतर तेथे आलेली मृत चिमुरड्याची आजी बलवीर कौर यांनी पोलिसांसमोर हात जोडून विनवणी केली की, माझ्या मुलीला सोडून द्या, तिने काहीही केलेले नाही. त्या पोलिसांच्या पायावर पदर पसरून मुलीच्या सुटकेची याचना करत होत्या.
- एसपी सिटी गुरमित सिंग म्हणाले, आता महिला असे म्हणतेय की, ती तणावात होती आणि तिला स्वत:वरच वार करायचे होते, पण तिचा स्वत:वरील ताबा सुटला अन् तिने बाळावरच सपासप वार केले.

 

हत्येच्या एका तासापूर्वी झोपाळ्यावर बसवून खाऊ घातले होते...
- आरोपी राजवीर कौरने एका दिवसापूर्वीच मुलाकडून शाळेचा होमवर्क करून घेतला होता आणि 2 जुलैला शाळेत पाठवण्याची तयारी करत होती.
- हत्येच्या एका तपासापूर्वी हरकिरत गल्लीत खेळत होता. त्याची आईच त्याला जेवू घालण्यासाठी घरी घेऊन आली. मुलाला झोपाळ्यावर बसवून जेवू घातले.
- कुटुंबीयांच्या मते, घरातल्या सगळ्यांनी मिळून नाष्टा केला होता. नंतर अंघोळीसाठी त्याची आई मुलाला तिच्या रूममध्ये असलेल्या बाथरूममध्ये घेऊन गेली होती. 


डिप्रेशन वा हाय- ब्लड प्रेशरमुळे कुणीही मर्डर करू शकत नाही...
ज्या निर्घृणपणे ही हत्या करण्यात आली आहे, ती ना डिप्रेशनमुळे, ना हाय ब्लड प्रेशरची केस आहे. कारण कोणतीही व्यक्ती डिप्रेशन वा बीपी हाय झाल्यावर असे कृत्य करू शकत नाही. जर त्याने अशा प्रकारची हत्या केलीच, तरीही तो एकापेक्षा जास्त वार करू शकत नाही.
- डॉ. अरुण बन्सल, मनोचिकित्सक, सिव्हिल हॉस्पिटल.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या हृदयद्रावक घटनेचे आणखी Photos...    

बातम्या आणखी आहेत...