आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • साप गुंडाळून वृद्धाची तहसीलमध्ये एंट्री A Man Brought A Snake Inside A Tehsildar Office In Gadag, Karnataka

पेन्शन न मिळाल्याने त्रस्त वृद्धाने गळ्यात साप गुंडाळून केली तहसीलमध्ये एंट्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु - कर्नाटकमधील गडक येथे एक आजोबा गळ्यात साप गुंडाळून तहसीलदारांच्या दालनात गेले. जोपर्यंत पेन्शन मिळत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आणि तहसीलदारांसह सर्वांचीच भंबेरी उडाली. 

 

68 वर्षांच्या या वृद्धाने पोस्ट ऑफिस पासून बँकेपर्यंत सर्व कार्यालयांना खेट्या घातल्या. तब्बल 8 महिन्यांपासून त्यांच्या पेन्शनचा प्रश्न प्रलंबित आहे. सर्वांनीच नकार घंटा वाजवल्याने त्रस्त झालेल्या माबू यांनी अखेर गळ्यात साप टाकला आणि तहसिल कार्यालय गाठले. पेन्शनचा प्रश्न मार्गी लागला नाही तर तहसिलदारांच्या दालनात साप सोडण्याची  धमकी दिली. त्यामुळे कार्यालयात गोंधळ उडाला. एका अधिकाऱ्याने माबू यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले आणि त्यांचा प्रश्न लवकर सोडवला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर ते सापासह कार्यालया बाहेर पडले. तेव्हा कुठे तहसिलदारांचा जीव भांड्यात पडला.

बातम्या आणखी आहेत...