आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • प्रेम झाले, शारीरिक संबंधही झाले, पळून जाताना कळले प्रियकराचे सत्य: A Shocking Love Story, About Love Jihad

मिस्ड कॉलवरून झाले प्रेम, घरातून पळून जाताना कळले प्रियकराचे खरे नाव, प्रेयसीला बसला धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरखपूर (यूपी) - पोलिसांनी 14 जून रोजी घरातून पळून चेन्नईला जात असलेल्या एका प्रेमीयुगुलाला पकडले आहे. दोघांची चौकशी करताना पोलिसांना प्रियकराचे आधारकार्ड सापडल्यावर हे प्रकरण आणखीनच खळबळजनक झाले. आधारकार्डवरील मुलाचे नाव वाचताच तरुणीला मोठा धक्का बसला. मुलाने आपला धर्म खोटा सांगून मुलीला फसवले होते. तरुणीने प्रियकरावर बलात्काराचा गुन्हाही दाखल केला आहे. 


- गोरखपूरच्या गुलरिहा पोलिस स्टेशन परिसरातील ही घटना आहे. पोलिसांच्या मते, प्रियकराचे नाव तरकुलहा गावातील रहिवासी अमीन उल हक (22) असे आहे. त्याने पिपराईचच्या रहिवासी तरुणीला आपले नाव सोनू विश्वकर्मा सांगितले होते. अमीन चेन्नईत काम करतो. तो काही दिवसांपूर्वीच आपल्या गावी आला होता. अमीन 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे वचन देऊन चेन्नईला नेत होता, परंतु पोलिसांनी त्या दोघांनीही पकडले.
- पोलिस स्टेशन इंचार्ज पी. के. सिंह म्हणाले, रात्री गस्तीदरम्यान त्यांची नजर या प्रेमीयुगुलावर गेली. चौकशी केल्यावर अमीनने ती मुलगी बहीण असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, बहिणीवर उपचार करण्यासाठी तो चेन्नईला जात आहे. पोलिसांना त्याच्या बॅगची तपासणी करताना आधार कार्ड आढळले. कार्डवर त्याचे नाव अमीन उल हक पुत्र अफलातून असे लिहिले होते.
- मुलगी त्याला आतापर्यंत सोनूच समजत होती. तिला जेव्हा त्याचे खरे नाव कळले, ती मोठमोठ्याने रडू लागली. तिने प्रियकराला चपलेने मारायला सुरुवात केली. यानंतर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
- मुलगी म्हणाली, एका मिस्ड कॉलनंतर दोघांची ओळख झाली होती. यानंतर दोघेही भेटू लागलो. दोघांमध्ये शारीरिक संबंधही झाले. परंतु तिला प्रियकराचे सत्य कळले नाही. मुलगी म्हणाली की, हा दहशतवादीही असू शकतो. त्याने जाणूनबुजून मला फसवले. पोलिसांनी चौकशी केली म्हणून वाचले, नाहीतर याने तिकडे नेऊन काय केले असते देवाला ठाऊक.

- ASP शलभ माथुर म्हणाले की, मुलाला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. तर पीडितेला आशा ज्योती केंद्रात ठेवण्यात आले आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचा Video...  

 

बातम्या आणखी आहेत...