आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • पत्नीचे प्रियकराशी लग्न लावून दिले अन् ढसाढसा रडला पती A Unique Wedding: Decision Of Husband: Marriage Of Wife And Boyfriend

\'एक विवाह ऐसा भी\': Wife प्रियकराशिवाय राहू शकत नव्हती म्हणून पतीनेच लावले तिचे दुसरे लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावताना पती गोलू. - Divya Marathi
पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावताना पती गोलू.

कानपूर - येथे एक अनोखे लग्न चर्चेचा विषय बनले आहे. पत्नीच्या प्रेमसंबंधांबाबत कळल्यावर पतीने तिचे लग्न प्रियकराशी लावले. तिची पाठवणी करताना पती ढसाढसा रडलाही. पतीने पत्नीचे लग्न थाटामाटात लावून दिले. ढोल-ताशांच्या गजरात प्रियकर नवरदेवाची वरातही काढली. विधीपूर्वक हे लग्न पार पडले.

 

असे आहे प्रकरण..
- कानपूरच्या चकेरी परिसरातील राहिवासी गोलू गुप्ता खासगी नोकरी करतो. 19 फेब्रुवारी 2018 रोजी गोलू आणि शांतीचे लग्न एका सामूहिक विवाह सोहळ्यात झाले होते.
- लग्नानंतर जेव्हा शांती सासरी आली, तेव्हा ती नेहमी उदास राहत होती. गोलूला कळून चुकले होते की, शांती त्याला पसंत करत नाही.
- ती म्हणायची की, तुम्ही जाऊन झोपा आणि स्वत: रात्रभर मोबाइलवर बोलायची. एका दिवशी त्याने विचारले तेव्हा तिने प्रेमकहाणी त्याला सांगितली.
- शांती सर्वकाही खरे सांगत म्हणाली की, ती मागच्या 3 वर्षांपासून रवी नावाच्या एका मुलाशी प्रेम करते. रवी लखनऊमध्ये राहतो. शांतीने म्हटले की, दोघांमध्ये अनेक वेळा संबंध बनलेले होते. ती रवीशिवाय जिवंत राहू शकत नाही.
- गोलूने सांगितले की, त्याला शांतीच्या प्रेमाबाबत बिलकुल माहिती नव्हते, जर याची माहिती असती, तर त्याने लग्नच केले नसते. 
- गोलूच्या मते, शांती त्याच्यासोबत राहू शकत नव्हती. मी ही बाब माझे कुटुंबीय आणि नातेवाइकांना सांगितली. सोबतच हेही सांगितले की, मी शांतीच्या लग्न तिच्या प्रियकराशी लावू इच्छितो. कारण जर ती येथे राहिली तर पूर्ण घर बरबाद होईल. आपली आणि कुटुंबाची बरबादी टाळण्यासाठी मी हा निर्णय घेतला.
- प्रियकराशी लग्नानंतर शांती म्हणाली, पूर्ण विश्वास होता की, मला प्रेम मिळेल. यासाठी मी गोलूचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही.
- प्रियकर रवी म्हणाला की, आम्ही दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतो. आमचे 3 वर्षे जुने नाते आहे. आमची मैत्री एका मिसकॉलमुळे झाली होती.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या अनोख्या लग्नाचे Photos व शेवटी Video...  

 

बातम्या आणखी आहेत...