आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • आंध्र प्रदेशात वीज इन्स्पेक्टरकडे आढळली तब्बल 100 कोटींची संपत्ती, 5 ठिकाणी छापे ACB Arrests Andhra Electrical Line Inspector For Disproportionate Assets

40 हजार पगार असलेला वीज इन्स्पेक्टर निघाला अरबपती, एवढी प्रॉपर्टी की पथकही झाले चकित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - आंध्र प्रदेशात अँटी करप्शन ब्यूरो (एसीबी) ने बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी ट्रान्समिशन कॉर्पोरेशनच्या इन्स्पेक्टरला अटक केली आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी त्यांच्या 5 जागांवर छापेमारी सुरू केली. सूत्रांनुसार, 2 जिल्ह्यांमध्ये इन्स्पेक्टरची तब्बल 100 कोटींची प्रॉपर्टी असल्याची माहिती हाती लागली आहे. त्याने अनेक मालमत्ता या मित्रांच्या आणि नातेवाइकांच्या नावे घेऊन ठेवल्या होत्या.

 

एसीबीचे डायरेक्टर जनरल आर. पी. ठाकूर म्हणाले, इन्स्पेक्टर एस. लक्ष्मी रेड्डी (56) याच्या कावली टाऊन स्थित घराशिवाय त्याच्या मित्र आणि नातेवाइकांच्या घरीही छापे टाकण्यात आले. छापेमारीत मिळालेल्या दस्तऐवजांवरून स्पष्ट होते की, रेड्डीजवळ नेल्लोर आणि प्रकराशम जिल्ह्यात 6 लक्झरी घरे, दोन प्लँट, 57 एकर जमीन आहे. सोबतच त्यांच्या बँक खात्यांमध्ये 10 लाख रोख आणि अनेक गाड्यांची माहिती मिळाली.

 

21 वर्षांत मिळाले फक्त 3 प्रमोशन: 
रेड्डीने 1993 मध्ये हेल्पर पदावरून वीज मंडळात नोकरीला सुरुवात केली होती. 3 वर्षांनंतर तो सहायक लाइनमन आणि यानंतर दुसऱ्या वर्षी प्रमोट होऊन लाइनमन बनला. 2014 मध्ये रेड्डीचे प्रमोशन लाइन इन्स्पेक्टरच्या पदावर झाले होते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos व Video..  

 

बातम्या आणखी आहेत...