आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 98 वर्षांच्या आईवर रेल्वेत चिप्स विकण्याची आली वेळ; दोन मुले आहेत बिझनेसमन..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद - प्रतापगड येथे राहणाऱ्या एक 98 वर्षीय वृद्ध महिला रेल्वेत चिप्स आणि पानमसाला विकून सुना आणि 3 नातवंडांचे पोट भरत आहे. हे काम त्या मागच्या 17 वर्षांपासून करत आहेत. 2 तरणीताठी मुले असूनही त्यांची अशी अवस्था झाली आहे. DivyaMarathi.Com म्हणूनच 98 वर्षे वयातही आयुष्याशी बिनबाद संघर्ष करणाऱ्या या मातेची कहाणी सांगत आहे.

 

मोठ्या मुलाने सोडली साथ...
- 98 वर्षे वयाच्या राजकुमारी प्रतापगडच्या चिलबिला परिसरात राहतात. त्यांच्या पतीचा मृत्यू होऊन अनेक वर्षै लोटली आहेत.
- राजकुमारी यांना 3 मुले आहेत. त्यांची दोन मुले लग्नानंतर वेगळी राहायला लागली. परंतु सर्वात लहान राजेशने आपल्या आईची साथ सोडली नाही. परंतु त्यानेही जगाचा निरोप घेतला, म्हणून वयोवृद्ध राजकुमारी यांच्यावर रेल्वेत चिप्स, पानमसाला विकण्याची वेळ आली.
- दोन मुली आणि एका मुलाचा पिता असलेला राजेश आवळ्यांचा छोटासा बिझनेस करत होता. यातून कुटुंबाच्या मूलभूत गरजा भागत होत्या. 
- राजकुमारी यांचा सर्वात मोठा मुलगा मुंबईत बिझनेसमन आहे, तर दुसरा प्रतापगड मध्येच फळांचा व्यापार करतो. चांगले उत्पन्न असूनही दोन्ही मुले वयोवृद्ध आईला विचारतही नाहीत, मग मृत भावाच्या कुटुंबाची विचारपूस तर दूरच.

 

मोडकीतोडकी इंग्रजीही बोलतात राजकुमारी
- राजकुमारी यांनी रेल्वेत पानमसाला विकत थोडीशी इंग्रजीही शिकल्या आहेत. कधी-कधी आपल्या ग्राहकांशी इंग्रजीतूनही बोलतात. 
- त्यांचे म्हणणे आहे की, 17 वर्षांपासून प्रवास करताना जगण्याच्या संघर्षानेच त्यांना इंग्रजी शिकवली. 
- चिलबिला स्टेशनवचर तैनात रेल्वे कर्मचारी अजय कुमार म्हणाले, मागच्या 17 वर्षांपासून पाहतोय, त्यांची येण्याची वेळ फिक्स आहे. त्या सकाळी ठीक 5 वाजता न चुकता स्टेशनवर पोहोचतात. 

 

पुढे क्लिक करून वाचा- 98 वर्षांच्या आईने कसा उचलला कुटुंबाचा भार...

बातम्या आणखी आहेत...