आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • AirAsia India Flight Delayed Passenger Complains Of Ill Treatment पॅसेंजर्सला उतरवण्यासाठी फास्ट केला AC

पॅसेंजर्सला उतरवण्यासाठी फास्ट केला AC, संपूर्ण प्लेनमध्ये झाला धूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - प्रायव्हेट एअरलाईन कंपनी एअर एशियाच्या एका फ्लाईटच्या पॅसेंजर्सने आरोप लावला आहे की, त्यांना बळजबरीने प्लेनच्या खाली उतरवण्यासाठी AC खूप जास्त प्रमाणात वाढवण्यात आला. यामुळे संपूर्ण प्लेनमध्ये धूर झाला. कंपनीने फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे मान्य केले परंतु प्रवाशांवर कोणत्याही प्रकारची बळजबरी केली नसल्याचे सांगितले.


एअर एशियाची ही फ्लाइट कोलकातावरून बागडोगरा येथे जात होती. परंतु कोलकाता विमानतळावर ही फ्लाइट चार तास लेट झाली. पॅसेंजर्सनी कंपनीवर आरोप लावला आहे की फ्लाइट लेट झाल्यानंतर त्यांना पहिले दीड तास बसवून ठेवण्यात आले आणि त्यानंतर खाली उतरवण्यासाठी मुद्दामून फ्लाइटमधील AC वाढवण्यात आला. यामुळे फ्लाइटमध्ये धूर झाला आणि लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. एका पॅसेंजरने फ्लाइटच्या आतील व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये प्रवाशी धुरामुळे त्रस्त झालेले दिसत आहेत.


फ्लाइटमध्ये भीतीदायक वातावरण 
- या फ्लाइटमध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे कार्यकारी निर्देशक दीपाशंकर राय हेसुद्धा होते. राय यांच्यानुसार, कोलकाता विमानतळावर खूप पाऊस पडत होता. प्रवाशांनी अशा परिस्थितीमध्ये प्लॅनमधून उतरण्यास नकार दिल्यानंतर कॅप्टनने प्रवाशांना घाबरवण्यासाठी एअर कंडिशनचा ब्लोअर फास्ट केला. यामुळे प्लेनमध्ये भीतीदायक वातावरण तयार झाले. संपूर्ण प्लेनमध्ये धूर झाला. सर्व लोकांना जीव गुदमरू लागला. लहान मुलं रडू लागले आणि उलट्या करू लागले. दिपाशंकर यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ अपलोड केला आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की - भारतात एव्हिएशन इंडस्ट्री अशाचप्रकारे काम करते.

बातम्या आणखी आहेत...