आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • ​पिरामल घराण्याची सून बनणार मुकेश अंबानींची कन्या ईशा, Anand Piramal To Marry Isha Ambani In December This Year

​पिरामल घराण्याची सून बनणार मुकेश अंबानींची कन्या ईशा, याच वर्षी डिसेंबरमध्ये होईल लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आनंद पिरामल व ईशा अंबानी यांचा याच वर्षी डिसेंबरमध्ये विवाह होणार आहे. - Divya Marathi
आनंद पिरामल व ईशा अंबानी यांचा याच वर्षी डिसेंबरमध्ये विवाह होणार आहे.

नॅशनल डेस्क - देशातील सर्वात श्रीमंत बिझनेसमन मुकेश अंबानी यांची कन्या ईशा याचवर्षी डिसेंबरमध्ये आनंद पिरामल यांच्याशी विवाह करणार आहे. आनंद पिरामल हे पिराम एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा अजय पिरामल आणि स्वाती पिरामल यांचे सुपुत्र आहेत. आनंद यांनी महाबलेश्वराच्या एका मंदिरात ईशा यांना प्रपोज केले, जे ईशा यांनी अॅक्सेप्ट केले. दोघांचे काही फोटोजही समोर आले आहेत. यात आनंद आणि ईशा समुद्र किनाऱ्यावर सेल्फी घेताना दिसले. 

 

दोघांचाही साखरपुडा झालाय...
- याशिवाय हॅलोमॅगइंडिया नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून रविवारी एक फोटो शेअर झाला. यात आनंद, ईशा अंबानीला किस करताना दिसत आहेत. 
- या पोस्टमध्ये #AakashAmbani #IshaAmbani आणि #AnandPiramal हॅशटॅगसोबत लिहिण्यात आले आहे की, 'अंबानी कुटुंबात एक आणखी ग्रँड वेडिंग.' सोबतच लिहिले आहे की, याच वीकेंडमध्ये दोघांचा साखरपुडाही झाला आहे.

 

कोण आहेत आनंद पिरामल?
- आनंद पिरामल 'पिरामल ग्रुप'चे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर आहेत.
- पिरामल एंटरप्राइजेस कंपनी फार्मा, हेल्थकेअर आणि फायनान्स सर्व्हिसच्या क्षेत्रात काम करते.
- वडील अजय पिरामल यांच्या व्यवसायात येण्यापूर्वी आनंद यांनी पिरामल ई-हेल्थ नावाने एक स्टार्टअप सुरू केले होते. जी आज 40,000 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करत आहे. याशिवाय दुसऱ्या स्टार्टअपचे नाव 'पिरामल रिअल्टी' आहे. या दोन्ही आता पिरामल एंटरप्राइजेसचा भाग आहेत.
- आनंद पिरामल यांनी पेन्सिल्व्हानिया युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. याशिवय हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केले आहे.
- पिरामल फाउंडेशनमध्ये सक्रिय असणारे आनंद पिरामल, इंडियन मर्चंट चेंबरचे यंगेस्ट प्रेसिडेंट राहिलेले आहेत.

 

काय करत आहे ईशा अंबानी?
- ईशा सध्या रिलांयस Jio ची जबाबदारी सांभाळत आहेत. त्या रिलायन्सच्या टेलिकॉम आणि रिटेल कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहेत.
- त्यांनी भाऊ आकाश अंबानीसोबत मिळून 2014 मध्ये Jio ची 4जी सर्व्हिस लॉन्च केली होती.
- याशिवाय ईशा  यांनी ajio नावाने एक ऑनलाइन फॅशन रिटेलर ब्रांडही लाँच केलेला आहे.
- ईशा यांनी येल यूनिवर्सिटीतून साइकॉलोजी आणि साउथ एशियन स्टडीजमध्ये पदवी प्राप्त केलेली आहे.
- जूनमध्ये ईशा स्टँडफोर्डच्या ग्रॅजुएट स्कूल ऑफ बिझनेसमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन प्रोग्राममध्ये मास्टर्स डिग्री पूर्ण करतील.


गोव्यात झाली होती आकाश-श्लोका यांची प्री-एंगेजमेंट सेरेमनी
- यापूर्वी 24 मार्च रोजी गोवाच्या ताज एक्झॉटिका रिसॉर्ट अँड स्पामध्ये मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश आणि श्लोका मेहता यांची प्री-एंगेजमेंट सेरेमनी झाली होती.
- येथे फुलांनी बनलेल्या एका मंचावर 8 मिनिटांचा फोटोशूट झाला होता. यात आकाश यांनी श्लोकाला प्रपोज केले, जे श्लोका यांनी अॅक्सेप्ट केले होते.
- यानंतर तेथे डान्स पार्टी झाली होती. यात आकाश-श्लोका यांच्यासह काही जवळच्या नातेवाइकांनी डान्सही केला होता.
- श्लोका हिरे व्यावसायिक रसेल मेहता यांची कन्या आहे. याच वर्षी डिसेंबरमध्ये दोघांचे लग्न ठरले आहे.

- 26 वर्षांचे आकाश आणि ईशा जुळे भाऊ-बहीण आहेत.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज व शेवटी व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...