आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाममध्ये मॉरल पोलिसिंग: बाइकवर जाणाऱ्या जोडप्याला अडवले, पंचायत बोलावून दोघांना अमानुष मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसाम मध्ये जोडपे गाडीवर चालले म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली. - Divya Marathi
आसाम मध्ये जोडपे गाडीवर चालले म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली.

गुवाहाटी - आसाममध्ये संस्कृती रक्षणाच्या नावाखाली एका जोडप्याला भर चौकात अमानुष मारहाण करण्यात आली. गोलपाडा जिल्ह्यातील ही घटना आहे. येथील पुखरीपार येथे एक मुलगा आमि मुलगी बाइकवर जात होते. त्यांना काही लोकांनी अडवले आणि पंचायत बोलावून भर चौकात दोघांना उभे करुन मारहाण करण्यात आली. या मॉरल पोलिसिंगचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

 

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस यंत्रणेला जाग आली. त्यांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. इतर आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल असा विश्वास डीजीपी कुलधर सैकिया यांनी व्यक्त केला आहे. 
काही दिवसांपूर्वीच दरंग जिल्ह्यातील कलाईगाव येथे एका प्रेमी युगुलाला मारहाण करण्यात आली होती.

 

बातम्या आणखी आहेत...