आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Cobra In Kitchen: तरुणीने तांदळाच्या पिशवी हात घालताच दिसला कोब्रा, गर्ल्स हॉस्टेलमध्ये उडाली खळबळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर - शहरातील केदार गौरी परिसरात एका गर्ल्स हॉस्टलमध्ये मोठी खळबळ उडाली. हॉस्टेलच्या मुली प्रचंड घाबरल्या, त्यांच्या किचनमध्ये कोब्रा नाग निघाला होता. स्वयंपाकासाठी तरुणी किचनमध्ये गेल्या होत्या. यादरम्यान तांदळाच्या पिशवीत एका तरुणीने हात घालताच तिच्या हातात कोब्राचे पिल्लू लागले. तिने ताबडतोब हात झटकला आणि आरडाओरड करून दुसऱ्या मुलींना तेथे बोलावले. मग या मुलींनी हेल्पलाइन नंबरवर फोन लावून सर्पमित्र शुभेंदु मलिकला बोलावले. शुभेंदुने कोब्रा पकडल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला. पकडलेला कोब्रा यानंतर त्याच्या नैसर्गिक अधिवासात दूर नेऊन सोडून देण्यात आला.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचा व्हिडिओ व फोटोज...   

बातम्या आणखी आहेत...