आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ही मुले पळवणारी टोळी नाही!' पोलिस हात जोडत होते तरीही जमावाने इंजिनिअरला केले ठार; पाहा धक्कादायक Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क, बीदर - कर्नाटकच्या बीदरमध्ये 14 जुलै रोजी एका इंजिनिअरची मुले पळवणारा समजून जमावाने बेदम मारून हत्या केली. त्या घटनेचा हा नवा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत एक पोलिस जमावाला हात जोडून मारू नका अशी विनंती करताना दिसत आहे. दुसरीकडे, 32 वर्षीय या सॉफ्टवेअर इंजिनिअरचा एक हात दोरीने बांधलेला दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ इंजिनिअरचा जीव जाण्याच्या ठीक आधीचा आहे. या घटनेत मृत तरुणाचे आणखी दोन मित्र जखमी झाले होते. पैकी एक कतारचा नागरिक आहे. पोलिसांनी हत्येप्रकरणी 30 जणांना अटक केलेली आहे. यात मुले पळवणाऱ्या टोळीची अफवा पसरवून जमावाला चिथावणी देणाऱ्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिन आणि घटनेचे फोटो काढणारे व्यक्तीही सामील आहेत.

 
चॉकलेट वाटत होता लहान मुलांना, जमावाने घेतला जीव
हैदराबादचा रहिवासी आजम आणि सलमान यांच्यासोबत त्यांचा मित्र सलाहम हे बीदरमध्ये त्यांचा मित्र बशीरला भेटायला आले होते. ते मित्राला भेटून वाटेतून परतत होते. वाटेत त्यांनी एका मुलाला शाळेतून परत येताना पाहिले. त्यांच्याकडे कतारहून आणलेले चॉकलेट होते. ते त्यांना त्या लहान मुलाला द्यायचे होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलाने चॉकलेटचा रॅपर पाहून ते घ्यायला नकार दिला. तेव्हा सलाहमने हट्ट करून मुलाला चॉकलेट देऊ लागला. यामुळे तो मुलगा रडू लागला. हे पाहून आसपास उपस्थित लोकांनी या तिघांना मुले पळवणारी टोळी समजून लाठ्या-काठ्यांनी मारहाण सुरू केली.
 
पळून जाऊ लागल्याने अडवला रस्ता
मृत तरुणाचे नाव मोहम्मद आजम उस्मानसाब (वय 28) असे आहे. सॉफ्टवेयर इंजीनियर उस्मानसाब आयटी कंपनी एसेंचरसाठी काम करायचा. तो कंपनीतर्फे गुगलच्या एका प्रोजेक्टवर काम करत होता. ते एका गावातून जीव मुठीत धरून पळाल्यावर त्यांना दुसऱ्या गावात घेरून बेदम मारहाण करण्यात आली.

 
एसपींनी वाचवला दोघांचा जीव
घटनेची माहिती मिळताच बीदरच्या एसपींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तिघांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. खूप प्रयत्नांनंतर त्यांनी दोघांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. परंतु तिसऱ्या साथीदाराची वाटेतच प्राणज्योत मालवली. तरुणांना वाचवत असताना एक इंस्पेक्टर आणि एक कॉन्स्टेबलही जखमी झाले.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या धक्कादायक घटनेचा Video व Photos...

 

 

बातम्या आणखी आहेत...