आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : मुलाने केली मारहाण, BJP आमदार वडिलांचे बेताल वक्तव्य, \'राईचा पर्वत\' करू नये...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थामधील बांसवाडाचे भाजप आमदार धनसिंह रावत यांच्या मुलाने एका कार चालकाला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर बरीच चर्चा होत आहे. या घटनेनंतर आरोपीचे वडील आमदार धनसिंह रावत यांनी बेताल वक्तव्य केले आहे. आमदार साहेबाच्या मते हा लहान मुलांमधील वाद असून यामध्ये आपण पडण्याची गरज नाही. धनसिंह रावत यांच्यानुसार "या घटनेला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. लहान मुलांमध्ये वाद होताच राहतात. मला तर याची चिंता आहे की, मुलांनी हा वाद आपसात मिटवला आहे की नाही. मुलांनी योग्यप्रकारे वागावे एवढीच माझी इच्छा आहे आणि आपण 'राईचा पर्वत' करण्याची गरज नाही."

 

काय आहे प्रकरण..
राजस्थानमधील बांसवाडा येथे भाजपचे आमदार धनसिंह रावत यांचा मुलगा मुलगा राजा रावतने एका व्यक्तीला रोडवर साइड दिली नाही म्हणून बेदम मारहाण केली. ही घटना विद्युत कॉलनीतील सांगण्यात एक आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, धनसिंह यांचा मुलगा राजा एका कारला ओव्हरटेक करून अडवतो. त्यानंतर तो स्कॉर्पिओतून खाली उतरतो आणि कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या व्यक्तीला मारहाण करतो. एवढेच नाही तर राजासोबत असलेल्या लोकांनी गाडीची तोडफोडही केली. 

बातम्या आणखी आहेत...