आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेने मुलाला चपलेने मारले, म्हणाली-माझ्या मुलाला हात लावायची हिम्मतच कशी झाली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर - लहान मुलांच्या भांडणाच्या किरकोळ वादातून एका मुलाच्या आईने दुसऱ्या मुलाला बेदम मारले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात महिला 10-11 वर्षाच्या मुलाला मारहाण करतेय. ही महिला मुलाला त्याच्या आईचे नाव विचारताना दिसतेय. प्रचंड रागात असलेल्या या महिलेने बराचवेळ मुलाला मारहाण केल्यानंतर चप्पल काढून चपलेनेही त्याला मारले. विंडसर हिल्स या उच्चभ्रू वस्तीतील हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. 


हा व्हिडिओ जेव्हा मुलाच्या वडिलांपर्यंत पोहोचला तेव्हा महिलेच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. मुलाचे वडील एका खासगी बँकेत मॅनेजर आहेत. आरोपी महिला बुटिक चालवते. पीडित मुलाने दिलेल्या माहितीनुसार, त्याची सायकल खाली होती. मारहाण केलेल्या महिलेचा मुलगा त्याची सायकल खेळत होता. त्याने खेळताना सायकल खाली पाडली. पीडित मुलाने सायकल उचलायला सांगितली तेव्हा त्याने नकार दिला. त्यावरून भांडण झाल्याने या मुलाने दुसऱ्या मुलाला मारले. तो मुलगा रडत घरी गेला आणि आईला सांगितले. त्यावर त्या महिलेना या मुलाला शिवीगाळ करत मारहाण केली. आरोपी जान्हवी छावडा यांनीही चूक मान्य केली. त्या म्हणाल्या की मी चपलेने मारहाण करायला नको होते. काही लोकांनी बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केल्याचे त्या म्हणाल्या. 

बातम्या आणखी आहेत...