आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bride Death: लग्नाच्या स्टेजवर कोसळली वधू, रुग्णालयात घेऊन जाण्यापूर्वीच मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - तेलंगणातील कुरनूल जिल्ह्यात लग्नाच्या मंडपातच नववधूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागर कुरनूल जिल्ह्यात 23 वर्षीय कोंडी निरंजम्मा उर्फ लक्ष्मी या तरुणीचा व्यंकटेश याच्याशी विवाह ठरला होता. ठरलेल्या तारखेनुसार, मंगळवारी या दोघांच्या लग्नाचा विधी सुरू होता. दोघांनी सप्तपदी देखील घेतले. त्याचवेळी अचानक लक्ष्मी स्टेजवर कोसळली. तिला तातडीने रुग्णालयाला रवाना करण्याची व्यवस्था करण्यात आली. परंतु, रुग्णालय गाठण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.


हार्ट अटॅक होते मृत्यूचे कारण
व्यंकटेश आणि लक्ष्मी मंडपात सप्तपदी क्रिया सुरू असताना तिच्या छातीत वेदना सुरू झाल्या होत्या. सात फेरे संपले तेव्हा ती सहन करू शकली नाही आणि स्टेजवर कोसळली. वर आणि वधू पक्षाच्या लोकांनी वेळीच तिला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. सर्वांना हा फक्त तणावामुळे आलेली चक्कर वाटत होते. परंतु, प्रत्यक्षात तिला हृदयविकाराचा धक्का बसला होता. तिला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, वाटेतच तिने जगाचा निरोप घेतला होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने झाला आहे. या घटनेने केवळ वधू-वर पक्षच नव्हे, तर लग्नात आलेल्या सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...