आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकणार नाहीत: पोटच्या मुलीलाच आईने एवढे बेदम मारले : Children Gone To Play Without Permission, Beating By Mother

शॉकिंग VIDEO: मुलगी आईला न सांगता खेळायला गेली, म्हणून एवढी भयंकर शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मथुरा, यूपी - न सांगता घराबाहेर खेळायला गेल्याने 4 वर्षीय चिमुकलीला आईने दाराला लटकावून छडीने बेदम मारहाण केली. हा VIDEO एकाने शूट करून सोशल साइटवर टाकला. ताबडतोब हा व्हिडिओ सोशलवर व्हायरला झाला. तथापि, पोलिसांत कुणीही तक्रार केली नाही. परंतु आईच्या या वागण्यावर चहुकडून टीकेचा भडिमार सुरू आहे.

-VIRAL व्हिडिओ मथुराच्या मुखराई गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे. घटना एका दिवसापूर्वीची आहे. चिमुकली न सांगता रोज घरासमोरील रस्त्यावरच खेळायला जायची.
- आई म्हणाली की, एका दिवशी ती भरधाव गाडीखाली येता-येता वाचली होती. यामुळेच ती मुलीला बाहेर खेळायला जाण्यापासून रोखत होती.
- अनेकदा बजावूनही मुलगी नजर चुकवून खेळायला गेली. यामुळे आईला प्रचंड राग आला आणि तिने तिला दाराला लटकावून छडीने बेदम मारले. नंतर कुटुंबातील इतर सदस्यांनी मध्ये पडून तिला सोडवले.
- संतप्त आईने रूममध्ये लपून बसलेल्या इतर मुलांनाही चापटा मारल्या. याप्रकरणी पोलिसांत कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.
- तथापि, SSP आदित्य कुमार म्हणाले की, व्हायरल व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. व्हिडिओची पडताळणी केली जाईल. त्यानंतरच याबाबत काहीही सांगणे शक्य होईल.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचा शॉकिंग Video आणि Photos...   

बातम्या आणखी आहेत...