आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅलेंटाइन डेच्या दुसऱ्या दिवशी प्रेमीयुगुलाची आत्महत्या, मेल्यानंतरही एकमेकांच्या मिठीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीमा आणि करण यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. - Divya Marathi
सीमा आणि करण यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

माऊंटआबू (राजस्थान) - व्हॅलेंटाइन डेच्या दुसऱ्याच दिवशी एका प्रेमी युगुलाने एकत्र गळफास घेतला आहे. ही घटना राजस्थानमधील माऊंटआबू जवळील माचगाव येथे घडली आहे. प्रेमी युगुलाने झाडाला दोरीबांधून एकत्र गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी गर्दी केली.

 

काय आहे प्रकरण 
- मुलगा आणि मुलगी दोघेही माचगावचेच असल्याची माहिती आहे. दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध होते, अशीही माहिती आहे. 
- प्रेमी युगुलाने झाडाला दोरखंड बांधून गळफास घेतल्याची माहिती मिळताच पोलिस अधिकारी भूपेंद्र सिंह संपूर्ण ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. 
- पोलिस पोहोचले तेव्हा, गावाशेजारील एका शेतात झाडाला प्रियकर आणि प्रेयसीचे मृतदेह लटकत होते. दोघांनी एकमेकांना मिठी मारत आत्महत्या केल्याचे दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
- पोलिसांनी दोन्ही मृतदेह खाली उतरवले आणि त्यांची ओळख पटवली. 
- पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृत मुलीचे नाव सीमा असून ती माऊंटआबूच्या माचगांव येथील रहिवासी आहे. तर मुलाचे नाव करण असून तोही त्याच गावत राहात होता. 
- सीमा आणि करण यांनी आत्महत्या का केली याचा पोलिस शोध घेत आहेत. 
- पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी माऊंटआबू येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये पाठवले. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, व्हिडिओ.... 

बातम्या आणखी आहेत...