आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक: भरदिवसा प्रेमी जोडप्याची गावातून निर्वस्त्र धिंड, Video Viral झाल्यावर पोलिसांची कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर - शहरापासून जवळच असलेल्या सुखेर पोलिस स्टेशनमधील सरे खुर्द गावात शुक्रवारी दुपारी प्रेमीयुगुलाला निर्वस्त्र करून गावातून धिंड काढण्यात आली. या लाजिरवाण्या घटनेदरम्यान गावकरी त्यांच्या मागे-मागे फिरत होते, परंतु कुणीही त्यावर आक्षेप घेतला नाही. गावातील एका व्यक्तीने पोलिस कॉन्स्टेबलला या घटनेचा व्हिडिओ पाठवल्यावर प्रकरणाचा खुलासा झाला. एसपी राजेन्द्र प्रसाद गोयल म्हणाले की, पोलिसांनी प्रेमीयुगुलाला गावातून सुरक्षितरीत्या आणले आहे. या प्रकरणातील आरोपी महिलेचा पती तारु गमेती, त्याचा भाऊ हरीश, काका लालू आणि काकू शांतीबाई यांना अटक करण्यात आली आहे.

 

असे आहे प्रकरण..

महिला आणि तरुणाचे समुदेशन केले जाते आहे. अॅडिशनल एसपी हर्ष रत्नू यांच्या नेतृत्वात पथक गावात गेले. तारूच्या 3 मित्रांचा शोध घेतला जात आहे. पोलिस म्हणाले की, महिलेचे (वय 23) पाच वर्षांपूर्वी सरे खुर्द येथील रहिवासी तारू गमेतीशी लग्न झाले होते. 3 वर्षे महिला त्याच्यासोबत राहिली. तिला या लग्नापासून एक अडीच वर्षांचा मुलगा आहे. यानंतर महिला झाड़ोलचा रहिवासी मांगीलालसोबत राहायला लागली, त्यापासूनही तिला 1 वर्षांचा मुलगा आहे.

 

पहिल्या नवऱ्याने 3 मित्रांसोबत मिळून केले निर्वस्त्र
दीड-दोन वर्षे त्याच्यासोबत राहिल्यानंतर महिला मागच्या काही महिन्यांपासून सरे खुर्दचा रहिवासी रामलाल (22) च्या प्रेमात पडली. रामलाल प्रवासी रिक्षा चालतो. तर महिला मजुरी करण्यासाठी गावातून यायची. त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. महिला रामलालशी लग्न करण्याचा विचार करत होती. रामलालही विवाहित आहे. त्याची पत्नी माहेरी गेली होती. यावर रामलालने महिलेला सरे खुर्द गावात आपल्या घरी बोलावले. महिलेने रामलाल हे सांगितले नव्हते की, हे गाव तिच्या पहिल्या पतीचे आहे. गुरुवारी रात्री तारूला ती गावात आल्याची माहिती मिळाली. यावर तो त्याचा लहान भाऊ हरीश आणि काका लालूसोबत रामलालच्या घरी गेला. तेथे त्यांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. यानंतर शांतिबाईने महिलेचे कपडे फाडले. प्रेमीयुगुलाला निर्वस्त्र करण्यात आले आणि दुपारी 12 ते 1 वाजेदरम्यान दोघांना गावातून फिरवले. यादरम्यान, तारूच्या 3 मित्रांनी या घटनेचा पूर्ण व्हिडिओही शूट केला.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या प्रकरणाचे आणखी photos...  

 

बातम्या आणखी आहेत...