आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CRIME: अंगणात पतीचा मृतदेह पुरला, वरती 3 गोण्या मीठ टाकले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पतीचा खून करुन त्याचा मृतदेह अंगणात पुरल्याच्या 4 महिन्यानंतर पोलिसांनी मर्डर मिस्ट्री सोडवली आहे. - Divya Marathi
पतीचा खून करुन त्याचा मृतदेह अंगणात पुरल्याच्या 4 महिन्यानंतर पोलिसांनी मर्डर मिस्ट्री सोडवली आहे.

शाहजहांपूर (उत्तर प्रदेश) - अवैध संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढला. प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करुन मृतदेह अंगणात पुरला. मृतदेहाचा वास सुटू नये आणि त्याची लवकर विल्हेवाट लागावी यासाठी त्यावर तीन गोण्या मीठ टाकले. त्यावर अंगणात सिमेंटचा ओटा बांधून या प्रकरणाशी आपला संबंधच नसल्यासारखे वागत असलेल्या महिलेला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

 

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अनेक गुन्हेगार सध्या अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या 'दृष्यम' सिनेमामध्ये वापरलेली ट्रिक्स वापरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पोलिस आणि कायद्यापासून ते त्यांच्या गुन्हा फार काळ लपवून ठेवू शकत नाही, हेच या प्रकरणाने सिद्ध केले आहे. 

पतीचा खून करुन त्याचा मृतदेह अंगणात पुरल्याच्या 4 महिन्यानंतर पोलिसांनी मर्डर मिस्ट्री सोडवली आहे.  

बातम्या आणखी आहेत...