आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • अंत्यसंस्काराआधी स्मशानात लोकांनी केला झिंगाट डान्स, 80 वर्षांच्या बुजुर्गाची हीच होती अंतिम इच्छा Family Member Dance In Funeral In Jahangirpura Area In Surat

अंत्यसंस्काराआधी स्मशानात लोकांनी केला डान्स, 80 वर्षांच्या बुजुर्गाची हीच होती अंतिम इच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत (गुजरात) - ओशोंच्या एका भक्ताच्या निधनानंतर त्यांच्या परिचितांनी आणि कुटुंबीयांनी स्मशानात झिंगाट डान्स करून उत्सव साजरा केला. म्युझिक लावून डान्स करण्यात आला. वास्तविक, ही मृत वृद्धाचीच अंतिम इच्छा होती. मृत वृद्धाच्या अवयवांचेही दान करण्यात आले होते.

- सुरतच्या जहांगीरपुरा परिसरातील श्रीधर सोसायटीतील रहिवासी 80 वर्षीय भगवती भाई पटेल यांची अंतिम इच्छा होती की, त्यांचा मृत्यू झाल्यावर कुणीही दु:ख व्यक्त करू नये. सर्वांनी त्यांना आनंदाने हसत-हसत निरोप द्यावा.
- मृत वृद्धाचे जावई दीपक भाई म्हणाले, त्यांचे सासरे रजनीश ओशोंची विचारधारा मानत होते. 3 दिवसांपूर्वी हार्टअटॅकमुळे त्यांचे निधन झाले होते. 
- भगवती भाई यांचा मुलगा अमेरिकेत राहतो. तोही ओशोंचा भक्त आहे. भगवती भाई यांनी आपले अवयवदानाची इच्छाही जाहीर केली होती, त्यानुसार मृत्युपश्चात त्यांचे अवयवदान करण्यात आले.  भगवती भाई यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग घेतला होता. या स्वातंत्र्यसैनिकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे लोकांनी म्युझिक लावून डान्स केला आणि मग त्यांना मुखाग्नि देण्यात आला.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, अंत्यसंस्काराआधी डान्स करतानाचा लोकांचा Videos व Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...