आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Accident: भीषण अपघातात 7 ठार, जिवंत वाचला 12 वर्षांचा मुलगा, आईच्या मृतदेहाजवळ बसून रडत राहिला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - सिरोहीच्या जवळ शुक्रवारी सकाळी एक अनियंत्रित कार ट्रकला धडकली. कारमध्ये स्वार 8 जणांपैकी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने 12 वर्षांचा मुलगा जिवंत राहिला. 5 जण जागीच मृत्यू झाला होता, यात जिवंत वाचलेल्या मुलाची आईही होती. राज बराच वेळ आपल्या आईच्या मृतदेहाजवळ बसून रडत राहिला. घटनास्थळी धाव घेतलेल्या लोकांनी त्याला रुग्णालयात नेले.

पोलिस म्हणाले, अपघात सिरोहीच्या पोसालियाजवळ झाला आहे. कार अनियंत्रित होऊन डिव्हायडरच्या पलीकडे गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. कारमध्ये जोधपूरचे रहिवासी प्रवीण भार्गव, त्यांची पत्नी डिंपल, मुलगी सेरीन, मुलगा राज याशिवाय त्यांचा मेहुणा कैलाश, त्याची पत्नी सुमित्रा आणि त्यांची दोन मुले होती. प्रवीण भार्गव कामानिमित्त गुजरातच्या भरूचमध्ये कुटुंबासोबत राहत होते. एका लग्न समारंभात सहभागी झाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासमवेत जोधपूरला गेले होते आणि कार्यक्रम संपल्यावर तेथून परत भरूचकडे जात होते. या भीषण अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या भीषण अपघाताचा Video व आणखी Photos...   

बातम्या आणखी आहेत...