आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असेही कोणी जात असते का? आई-मुलगा, बाप-लेक, भाऊ-भाऊ; संपूर्ण शहराने दिला अखेरचा निरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्यावर/जोधपूर - अजमेर जिल्ह्यातील ब्यावर येथे लग्न सोहळ्यादरम्यान झालेल्या सिलिंडर स्फोटात बिल्डिंग कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रविवारी वर हेमंतची आई आशादेवीसह 10 जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आले. आता मृतांची संख्या 19 झाली आहे. जिल्हाधिकारी गौरव गोयल यांनी सांगितले की कुटुंबीयांनी दिलेल्या बेपत्ता लोकांच्या यादीनुसार सर्वांचे मृतदेह काढण्यात आले आहेत. मात्र ढिगारे हटवण्याचे काम अजूनही सुरु आहे. त्यामुळे ढिगारा उपसल्यानंतरच मृतांचा निश्चित आकडा सांगता येईल. दुसरीकडे मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची भेट घेतली. 5 जखमींना जयपूरला हलवण्यात आले आहे.

 

केव्हा घडली घटना
- ब्यावर येथील नंदनगरमधील कुमावत समाज भनामध्ये 16 फेब्रुवारी रोजी सांयकाळी 6 वाजता सिलिंडरचा स्फोट झाला होता. गेल्या आठवड्यात शुक्रवारी झालेल्या या घटनेत 5 जणांचा जागेवरच मृत्यू झाला होता. तर 21 पेक्षा जास्त जण जखमी होते. वराच्या आईसह अनेक लोक बेपत्ता होते. त्यापैकी 19 जणांचे मृतदेह सापडले आहेत. 
- सिलिंडर रिफिलिंग करताना ही घटना घडली होती. सिलिंडरचा स्फोट झाला तेव्हा आसपासच्या 12 घरांचे नुकसान झाले होते. 

एकाच घरातील 10 जणांचा मृत्यू, संपूर्ण शहराने दिला मुले, सुना आणि नातवांना अखेरचा निरोप 
- पीपाड येथे राहाणारे राखीव पोलिस दलाचे निवृत्त जवान देवनारायण यांचे खांदे आणि गुडघे दोन्ही फुटले आहेत. त्यांचे दोन तरुण मुले, दोन सूना आणि दोन नातवांचा या सिलिंडर स्फोटात मृत्यू झाला. संपूर्ण घर सुने-सुने झाले. ते घराबाहेर बसून सांत्वनासाठी आलेल्या लोकांकडे पाहात 'असेही कोणी जात असते का', 'आता या घरात काय राहिले आहे?' असे विचारत असतात. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, 14 महिन्यांचा मुलगा आईला शोधत रडतो...

शेवटच्या स्लाइडवर पाहा व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...